spot_img

७ मार्च ला अमरावतीत निःशुल्क स्तन कर्करोग तपासणी शिबिर, खा. नवनीत राणा राहणार उपस्थित प्रसिद्ध कर्करोग तज्ञ करणार तपासणी

७ मार्चला अमरावतीत निःशुल्क स्तन कर्करोग तपासणी शिबिर

●खा. नवनीत राणा राहणार उपस्थित

●प्रसिद्ध कर्करोग तज्ञ करणार तपासणी

●मिररवृत्त
●अमरावती

उ कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर अमरावती येथे ७ मार्च रोजी निःशुल्क स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी १० वाजता या शिबिराचे उदघाटन होणार असून खा. नवनीत राणा या शिबिराला मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत.
रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिका, सुजान कॅन्सर हॉस्पिटल अमरावती व अमरावती कॅन्सर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिराला खा. नवनीत राणा यांचेसह रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाच्या अध्यक्षा डॉ. मोनाली ढोले,सचिव अमोल चवणे,कीर्ती बोडखे व डॉ. राजेंद्रसिंग अरोरा यांची उपस्थिती असणार आहे.
महिलांमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या स्तन कर्करोगाबाबत जागरूकता मोहीम राबविण्याच्या उद्देशाने तसेच ज्या महिलांना स्तन कर्करोगाचा सामना करावा लागत आहे त्यांना या आजारातून मुक्त करण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून अमरावती कॅन्सर फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड. अशोक जैन, डॉ. राजेंद्रसिंग अरोरा, सचिव डॉ. डी.जी.अडवाणी,डॉ. आर. आर. सोनी, डॉ. नीता अरोरा, डॉ. वर्षा अग्रवाल, डॉ. अनघा कलोती, डॉ. सिदकसिंग अरोरा,डॉ. हसमितकौर अरोरा, डॉ. प्रतिमा पवार आदी तज्ञ मार्गदर्शन आणि स्तन कर्करोगाबाबत निदान करणार आहे.तरी या निःशुल्क शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहिती साठी डॉ. मोनाली ढोले यांचे हॉस्पिटल रुख्मिनीनगर अमरावती व अरोरा हॉस्पिटल शंकर नगर अमरावती येथे संपर्क साधण्याची विनंती करण्यात येत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!