गुरू ग्लोबल स्कुलच्या बालशिवाजींनी वेधले लक्ष
●शिवजयंतीनिमित्य चिमुकल्यानी साकारल्या वेशभूषा
●नांदगाव पेठ
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना साद घालणाऱ्या येथील गुरू ग्लोबल स्कुल मध्ये शिवजयंतीचे औचित्य साधून २० फेब्रुवारी रोजी वेशभूषा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालशिवाजींनी साकारलेल्या वेषभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
शिवजयंतीनिमित्य गुरू ग्लोबल स्कुल मध्ये आयोजित वेशभूषा स्पर्धेत राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा सृष्टी राऊत या विद्यार्थिनीने तसेच बाल शिवाजी ची भूमिका अमेय मानेकर याने साकारून तसेच इतर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी वेशभूषा साकारून कार्यक्रमाचे आकर्षण वाढवले.प्रारंभी उपस्थित शिक्षकवृंद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा छ.शिवाजी महाराज यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाकरिता शाळेतील शिक्षिका सौ. अश्विनी मानेकर, भाग्यश्री भगत, अंकिता पडोळे, अंजली खेकरे, कोमल देशमुख,शंकर देहाडे आदी उपस्थित होते.