spot_img

भातकुली नगरीत गजानन माऊलींच्या जयघोषात श्रींची प्राणप्रतिष्ठा

भातकुली नगरीत गजानन माऊलींच्या जयघोषात श्री ची प्राणप्रतिष्ठा

■ भाविकांच्या घोषणांनी आसमंत दुमदुमला

■ संतमहातम्यांच्या उपस्थितीत मंदिरावर केले कलशारोहन
■ हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
■ अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट

■मिररवृत्त
■भातकुली

 

येथील आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळील श्री गजानन महाराज मंदिरात आज सकाळी ‘श्री’ च्या मूर्तीची धार्मिक विधिसह मोठ्या उत्साहात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी जय गजानन माऊली, गण गण गणात बोतेच्या हजारो भाविकांच्या जयघोषाने सारा आसमंत दुमदुमला होता. यावेळी मंदिरावर कलश चढविण्यात येऊन हजारो महिला,पुरुष, बालगोपाल भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्री गजानन महाराज कृपेने व सर्व भाविक भक्तांच्या सढळ हाताच्या देणगीतून श्री च्या मंदिराची भव्य वास्तू उभारण्यात आली आहे.

आज सकाळी ६ वाजता स्थापित देवता पूजन करण्यात येऊन श्री गजानन महाराज यांच्या सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर नामकरण, मुंज, मुख्य देवता हवन, पूजा, सिष्टकृत नवाहुती, बलिदान, पूर्णाहुती व सामुहिक आरती इत्यादी धार्मिक कार्यक्रम उत्साहात करण्यात आले.
दरम्यान, गजानन महाराज मंदिराच्या घुमटावर कलश चढविण्यात आला. यावेळी श्री च्या हजारो भाविक भक्तांनी सर्व धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्री च्या प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन समारोहा दरम्यान मंगळवार २० फेब्रुवारीला श्री च्या मूर्तीची कलश शोभायात्रा, नगर परिक्रमा करण्यात आली. त्यानंतर यज्ञ विधी व संध्याकाळी भजन सोहळा आयोजित करण्यात आला होता.
बुधवारी, दिनांक २१ फेब्रुवारी ला सकाळी ८ वाजता स्थापित देवता पूजन, होम हवन विधी, स्थापित देवता हवन, मूर्ती शयनादी कास, इत्यादी धार्मिक कार्यक्रम झाले. तर, दुपारी महिला मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम झाला.
श्री च्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान श्रीमद जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी श्री राजेश्वरानंदाचार्य ( समर्थ माऊली सरकार) यांची उपस्थिती होती. तर, स्वामी प्रशांतनंद महाराज ( ऋषिकेश, हिमालय), श्री. नागाबाबा अखिलेश्वर पुरीजी महाराज (इलाहाबाद), स्वामी विष्णु देवानंदजी गिरी महाराज ( हरिद्वार), श्री. हरी महाराज ( केळवद ) यांची तीन दिवस प्रमुख उपस्थिती होती.


श्री च्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आमदार रवी राणा, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, शिवसेनेच्या प्रीती बंड, भाजपाचे तुषार भारती, सामाजिक कार्यकर्ते नितीन कदम, प्रशांत जाधव, सुनील राणा, आदी मान्यवरांनी भेट देऊन श्री चे दर्शन घेतले तसेच महाप्रसादाचा लाभदेखील घेतला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!