अखेर ‘त्या’ प्रवेशद्वाराला मिळाली सीईओंची नाहरकत
◆ऍड. दीपक सरदार यांच्या पाठपुराव्याला यश
◆तर आम्ही प्रवेशद्वाराचे काम सुरू करू
◆मिररवृत्त
◆अमरावती
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचे फलक लावण्यावरून काही दिवसांपूर्वी तणाव निर्माण झाला होता.प्रवेशद्वारसंबंधी वरिष्ठांची नाहरकत नसल्याचे ग्रामपंचायत सचिवाने सांगितले होते त्यानंतर रिपाई चे विधानसभा संघटक ऍड. दीपक सरदार यांनी याप्रकरणी महत्वाची भूमिका निभावत प्रवेशद्वार बसविण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता मोहपात्रा यांचेकडे रीतसर तक्रार केल्यानंतर अखेर १६ फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रवेशद्वार लावण्यासंदर्भात नाहरकत दिल्याने आंबेडकरी अनुयायांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
२०२० मध्ये ग्रामपंचायत पांढरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुख्य प्रवेशद्वार बसविण्यासंदर्भात ठराव घेण्यात आला होता. मात्र ४ वर्ष झाले तरी ग्रामपंचायत प्रवेशद्वार लावण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत पुन्हा याच विषयावर चर्चा करण्यात येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार लावण्याचे निश्चित केले मात्र ग्रामपंचायतने याबाबत काहीच पुढाकार न घेतल्याने अखेर १४ फेब्रुवारी रोजी गावातील अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार पांढरी असे फलक लावल्याने त्याठिकाणी दोन गटात तणाव निर्माण झाला होता.
ऍड. दीपक सरदार यांनी अनुयायांना शांतता स्थापन करण्याचे आवाहन केल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना रीतसर निवेदन देऊन त्या निवेदनाची दखल घेत सीईओ यांनी त्या प्रवेशद्वाराला नाहरकत प्रमाणपत्र देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार बांधकाम करण्यासाठी तातडीने पत्रव्यवहार केला.
नाहरकत मिळाल्याने आंबेडकरी अनुयायी यांनी जय भीम चा जयघोष करत ऍड. दीपक सरदार यांचा सत्कार केला. दीपक सरदार यांनी आव्हान केले की येत्या आठ दिवसात प्रवेशद्वार बांधकाम पूर्ण करा अन्यथा आम्ही गावकरी ते काम पूर्ण करू.
यावेळी विनोद रायबोले, निलेश रायबोले, रत्नदीप रायबोले, रवींद्र रायबोले, छाया अभ्यंकर, महेश वाकपांजर, सागर रायबोले, विकास रायबोले, शुभम रायबोले, आशिष मोहोड, अंकुश इंगळे, अमोल वानखडे, रोशन बगाडे, अभिजित इंगोले, प्रवीण रायबोले आदी रिपाई कार्यकर्ते व गावकरी मंडळी उपस्थित होते.तूर्तास गावात शांतता प्रस्थापित असून ग्रामपंचायत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.