spot_img

मंगरूळ दस्तगीर येथील शेतात सापडली बिबट जातीचे दोन पिल्ले

मंगरूळ दस्तगीर येथील शेतात सापडली बिबट जातीचे दोन पिल्ले

◆मिररवृत्त

◆मंगरूळ दस्तगिर

● शरद देवगिरकर●

मंगरूळ दस्तगीर येथील शेतशिवारात गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान दिघी महाले रस्त्यावर असलेल्या  शैलेश जयस्वाल यांच्या उसाच्या शेतामध्ये कामगार कापणी करत असतांना त्याठिकाणी दोन पिले आढळून आले. कामगारांनी याबाबत तातडीने शैलेश  जयस्वाल यांना सूचना दिली.त्यानंतर  माजी जि. प. सदस्य सुरेश निमकर यांना मोबाईल द्वारे सूचना देऊन त्यांनी  वन विभागाचे अधिकारी भानुदास पवार यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पवार यांनी तात्काळ  रेस्क्यू टीम पाठवून सदर बिबटाचे दोन्ही  पिल्ले ताब्यात घेतले व त्यांना वन रुग्णालयात दाखल करण्यात आले.भानुदास पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत  आवश्यकता असेल तर त्या पिलांवर उपचार करण्यात येईल अन्यथा त्यांना वनपरिक्षेत्रात सोडण्यात येईल अशी माहिती दिली तसेच मादी बिबट जेरबंद करण्याकरिता वनविभाग यांनी कॅमेरे लावलेले असून सापळा रचून लवकरच मादी बिबट ला पकडण्यात येईल असे आश्वासन दिले तूर्तास शेतकरी तसेच शेतमजूर यांनी शेतामध्ये जाताना एकटे जाऊ नये ही सुद्धा सूचना त्यांनी दिलेली आहे मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन अधिकारी पुढील तपास करत आहेत.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!