spot_img

सोयाबीन, कापूस, संत्रा उत्पादकांचा नांदगाव पेठ येथे रास्ता रोको ,शेतकरी विरोधी सरकारचा केला निषेध ,टोल नाक्याजवळ अडविली शेकडो वाहने

सोयाबीन, कापूस, संत्रा उत्पादकांचा नांदगाव पेठ येथे रास्ता रोको

◆शेतकरी विरोधी सरकारचा केला निषेध
◆टोल नाक्याजवळ अडविली शेकडो वाहने
◆शेतकरी महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

मूठभर लोकांना जागतिक श्रीमंतीच्या शिखरावर बसविण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी देणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाला कंटाळून गुरुवारी दुपारच्या सुमारास सोयाबीन, कापूस आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने नांदगाव पेठ टोल नाक्याजवळ रास्ता रोको करण्यात आला.शेतकरी पुत्र अमित अढाऊ यांच्या नेतृत्वात असंख्य शेतकरी महिला पुरुष या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते. महामार्गावर बसून आंदोलकांनी वाहने अडविल्याने अखेर पोलीसांनी आपल्या बळाचा वापर करत आंदोलकांना पोलीस व्हॅन मध्ये बसवून नांदगाव पेठ पोलीस स्टेशन येथे आणले व त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून त्यांना सोडून देण्यात आले.
परिसरातील असंख्य शेतकऱ्यांनी गुरुवारी दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास टोल नाक्याजवळ एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी सरकार विरोधात प्रचंड घोषणा दिल्या.शेतकरी विरोधी धोरणे राबविल्या जात असल्याने देशातील शेतकर्यांनावर उपासमारीची व पर्यायाने आत्महत्येची वेळ आलेली आहे.केंद्र व राज्य सरकार आज देशातील शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी आंदोलनकर्ते अमित अढावू यांनी केला आहे. आंदोलनात सहभागी महिला व पुरुषांनी महामार्ग अडवून धरल्याने शेकडो वाहनांची चाके थांबली होती. त्यामुळे नांदगाव पेठ पोलीस स्टेशन चे ठाणेदार हणमंत डोपेवाड,पोलीस उपनिरीक्षक गजानन लोकडे यांचेसह पोलिसांनी वापर सर्व आंदोलकांना पोलीस व्हॅन मध्ये बसवून त्यांना पोलीस स्टेशन मध्ये आणले व त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करून त्यांना सोडण्यात आले.यावेळी महामार्गाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.

यावेळी संपूर्ण कर्जमाफी करा,सोयाबीनला खाजगी बाजारात प्रति क्विंटल किमान ८०००/- रु.व कापसाला खाजगी बाजारात प्रति क्विंटल किमान १०,०००/- रू. भाव स्थिर रहावा यासाठी केंद्र सरकारने धोरण आखावे,महिला बचत गटांचे कर्ज माफ करून सरकारने त्यांना भरीव प्रोत्साहनपर अनुदान द्यावे.संत्रा प्रक्रिया केंद्र उभारावे.ता. मोशी येथिल अप्परवर्धा धरणाचे १३ दरवाजे उपस्यामुळे सिम्भोरा, येवती, भांभोरा या गावातील शेताचे व पिकाचे नुकसान झाल्याने भुसंपादन करुन नुकसान भरपाई देण्यात यावी,संत्रा साठवणूक करण्याकरीता शितगृहे (कोल्ड स्टोरेज) उभारावे.मागील वर्षीचा व चालू वर्षाचा १००% पीकविमा देण्यासाठी पीकविमा कंपन्यांना बाध्य करावे,जंगली जनावरांच्या त्रासापासून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी शेतीना सरकारने संरक्षण कुंपण घालून द्यावे,शेतमजुरांना सुरक्षा कवच द्या.ल,संत्रा उत्पादक शेतक-यांचे हित लक्षात घेऊन शासनाने विमाहप्ता कमी करून संत्रा उत्पादक शेतक-यांना दिलासा द्यावा,जिल्ह्यातील प्रलंबीत असलेली महात्मा ज्योतीबा फुले कर्जमुक्त योजनेतील प्रोत्साहनपर अनुदान रकम तात्काळ देण्यात यावी अश्या मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या.


या रास्ता रोको आंदोलनात स्वप्नील कोठे, जीवन हटवार, भूषण कांडलकर,प्रफुल्ल उमरकर, पिंटू तायवाडे, कलीम सौदागर, राधिका देशमुख, प्रणित शेकार, गोपाल चोपडे, अमूल ढोके,कुंदन काळे,प्रेम जवंजाळ, अनिल पवार,उज्ज्वल कुचे,जीवन हिवसे मंगेश कडू,संगीता देवतळे,बाळासाहेब पाचघरे,गजानन चौधरी अमित पोकळे,निखिल टोपले, तुषार खवले,नितीन पाचघरे, अंकुश ठाकरे यांचेसह असंख्य शेतकरी सहभागी झाले होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!