दिल्ली सील, बंदोबस्तासह 144 लागू
◆मंत्र्यांसोबत वाटाघाटी निष्फळ,शेतकऱ्यांची आज दिल्लीला कूच
◆मिररवृत्त
◆चंदीगड
शेतकरी दिल्लीला कूच करण्याच्या आधी चंदीगडमध्ये शेतकरी नेते व केंद्रीय मंत्र्यांमधील वाटाघाटी निष्फळ ठरल्या. पिकास हमीभाव देणारा कायदा व कर्जमाफीबाबत दोन्ही बाजूने सहमती होऊ शकली नाही. सरकारकडून खाद्य व ग्राहक मंत्री पीयूष गोयल, कृषिमंत्री अर्जुन मुंडा, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय चर्चेत सहभागी होते.
शेतकऱ्यांकडून सरवनसिंह, जगजितसिंह डल्लेवाल यांच्यासह १३ शेतकरी बैठकीत सहभागी होते.शेतकरी दिल्लीला कूच करणार असल्याने सरकारने पूर्ण तयारी केली आहे. रस्ते बंद केले आहेत कलम १४४ लाग केले.मोर्चासाठी टॅक्टर-टॉली प्रवेशाला मनाई आहे.
बॅरिकेड्सचे अनेक स्तर लावण्यात आले आहेत. परंतु संघटनेचा संदेश मिळताच शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले होते.दिल्ली कूचपूर्वी अनेक शेतकरी नेत्यांचे सोशल मीडिया अकाउंट बंद करण्यात आले.त्यावर बंदी घालण्यात आली.त्यात शेतकरी नेते रमणदीपसिंह मान यांच्यासह अर्धा डझन नेत्यांचा समावेश आहे.
●असे असेल नियोजन●
1. बॅरिकेड्स तोडणे : पहिल्या योजनेनुसार बॅरिकेड्स तोडून दिल्लीत घुसणे. त्यासाठी ५०-६० तरुणांचे पथक.
2. पर्यायी मार्ग : बॅरिकेड्स तोडण्याबरोबरच शेतकरी हरियाणा व पंजाबमधील गावांतून जाणाऱ्या रस्त्यांचीही यादी तयार करत आहेत. तेथून रात्री ट्रॅक्टरने हरियाणात प्रवेश करता येऊ शकेल.
3. रोखले तेथेच ठिय्या : तिसरी योजना अशी : पोलिस-प्रशासनाने रोखले तेथेच ठिय्या द्यायचा असे शेतकऱ्यांनी ठरवले आहे.
◆ढाल बनतील हरियाणवी◆
हरियाणाचे शेकडो शेतकरी पंजाबच्या जथ्थेबंदीच्या मदतीसाठी संगरूर, पतियाळा, फाजिल्कासह अनेक क्षेत्रात दाखल झाले आहेत. महलां गावात पंजाबच्या शेतकऱ्यांची ढाल होऊन आगेकूच करणार.हरियाणा सरकारने रस्ता रोखल्यास हरियाणाचे शेतकरी
पंजाबी शेतकऱ्यांना दिल्लीला नेतील.