अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा ?
◆भाजपमध्ये आजच प्रवेश करणार असल्याचा दावा
◆मिररवृत्त
◆मुंबई
लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असताना महाराष्ट्र काँग्रेसला मोठे खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. त्यांनी सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचा दावा केला जात आहे. पण याची अद्याप पुष्टी झाली नाही. दुसरीकडे, भाजपच्या मुंबई स्थित कार्यालयात आज मोठा पक्षप्रवेश होणार असल्याचे बॅनर लावण्यात आल्यामुळे या चर्चेला सकारात्मक बळ मिळाले आहे. दरम्यान, अशोक चव्हाण नॉटरिचेबल झाल्याचीही चर्चा आहे.