spot_img

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे दीर्घ आजाराने निधन

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे दीर्घ आजाराने निधन
◆अतुल बेनकेंना पितृशोक, धरणग्रस्तांसाठी दिला होता दीर्घ लढा
◆मिररवृत्त
◆पुणे
  पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे निधन झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. जुन्नर विधानसभेचे त्यांनी अनेक वर्षे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. जुन्नरचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांचे ते वडील होते. वल्लभ बेनके हे पवार कुटुंबियांचं निकटवर्तीय मानले जात होते. बऱ्याच महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र अखेर रात्री चाकण येथील खासगी रूग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
    सोमवारी सायंकाळी चार वाजता जुन्नरमधील हिवरे बुद्रुक येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जुन्नर विधानसभा मतदार संघातून सलग सहावेळा निवडणूक लढवून त्यातील चार वेळा त्यांनी निवडणूक जिंकली होती.वल्लभ बेनके यांचा जन्म 23 जून 1950 रोजी हिवरे बुद्रुक या गावात झाला. ते शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. त्यांना सहा वेळा विधानसभेचे तिकिट मिळाले होते. तर त्यांनी 1985 ते 2009 या कालावधीत त्यांनी आमदार म्हणून जुन्नरची सेवा करत तालुक्याचा विकास केला. धरणग्रस्तांसाठी त्यांनी दीर्घ लढा दिलेला आहे.
  मूळ शेतकरी असलेले माजी आमदार वल्लभ बेनके यांचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोठा अभ्यास होता. राजकीय वर्तुळात त्यांची शेतकऱ्यांप्रती जिव्हाळा, कुशल संघटक, अभ्यासू नेता म्हणूनच ओळख होती. कांदळी एमआयडीसीची स्थापना केली. त्यांनी लेण्याद्री आणि ओझर देवस्थानच्या परिसराचा विकास केला. नारायणगाव येथील टोमॅटोचे खरेदी विक्री बाजार केंद्र सुरू करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. यासह त्यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळात महत्वाची भूमिका बजावली आहे.
       ●अजित पवार यांनी व्यक्त केला शोक●
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेनके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांच्या निधनानं शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी लढणारं, जुन्नर तालुक्यासह पुणे जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो
spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!