विकास विद्यालयामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत वक्तृत्व स्पर्धा
◆मिररवृत्त
◆अमरावती
स्थानिक विलास नगर स्थित विकास विद्यालयांमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेमधून राबविण्यात येत असलेल्या’ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान अंतर्गत विद्यालयांमध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा पार पडली.” डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक कार्य”या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली.
वकृत्व स्पर्धा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक डी.एस.चव्हाण तर संजय गावंडे,प्रवीण भागवत व पी.आर.पोटे शिक्षण महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी शिक्षिका मंजुषा वानखडे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वकृत्व स्पर्धेच्या या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंजुषा वानखडे यांनी केले.
याप्रसंगी विद्यालयातील वर्ग पाच ते दहा च्या विद्यार्थ्यांनी आपले वक्तृत्व सादर केले यामध्ये वर्ग पाचवीची विद्यार्थिनी प्रियंका मोहोड,वर्ग सहा मधून चंदन राठोड ,अन्वेष बसवनाथे,जानवी अंबाडकर ,अर्पिता मेश्राम वर्ग सातच्या विद्यार्थिनी कोमल तायडे, निधी खोब्रागडे ,प्रसाद चव्हाण वर्ग आठ मधून नैतिक शिंदे, हर्ष वर्धे वर्ग 9 मधून नम्रता तायडे , पायल बोंडाईत ,कबीर दाभाडे ,वीर कोठार, वर्ग 10 मधून भूमिक्षा वर्धे या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असं वक्तृत्व उपस्थितांसमोर सादर केलं.
या वकृत्व स्पर्धेचे परीक्षक म्हणून विद्यालयातील शिक्षक ए. एस.बडगे, बी.एड. प्रशिक्षणार्थी श्रद्धा काकडे, दिनेश राठोड यांनी परीक्षण केले.यावेळी वर्ग पाच ते सात या गटामधून प्रथम क्रमांक अन्वेष बसवनाथे ,द्वितीय क्रमांक अर्पिता मेश्राम, तृतीय क्रमांक निधी खोब्रागडे या विद्यार्थ्यांनी पटकाविला. तर वर्ग आठ ते दहा च्या गटामधून प्रथम क्रमांक नैतिक शिंदे, द्वितीय क्रमांक पायल बोंडाईत ,तृतीय क्रमांक कबीर दाभाडे या विद्यार्थ्यांनी मिळवला. बक्षीस पात्र सर्व विद्यार्थ्यांचे बी.एड. प्रशिक्षणार्थ्यांनी गुलाब पुष्प व भेट देऊन अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये शालेय उपक्रमांचा सहभाग या विषयावर प्रकाश टाकला. प्रमुख अतिथी प्रवीण भागवत यांनी शाळेत चालणारे सर्व उपक्रमाबाबत तसेच या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर होणारा परिणाम या विषयावरती आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक डी .जी. निगोट,के .जी. शिरभाते, व्ही .एम. काळे,एम.आर.सोनवाल, डॉ . संदीप जुनघरे, शिक्षकेतर कर्मचारी सरकटे, बी.एड. प्रशिक्षणार्थी अलका कराळे , आचल काळे,अंजली बनाई, ऋतुजा पतिंगे ,कु .प्रगती त्रिपाठी कु.स्वाती अय्यर, कुमारी मीनल लाचुरे , प्रज्वलि सदार , दीक्षा काकडे, मनीषा वानखडे , मयुरी गणोरकर , मयुरी भुस्कटे ,दिव्या डगवाल,प्रियंका उईके ,स्नेहल काळे तसेच बी.एड. प्रशिक्षणार्थी शिक्षक दिनेश राठोड,पवन आडे,दिनेश राठोड ,संदीप भडांगे उपस्थित होते. कार्यक्रमाकरिता विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाचा शेवट खाऊवाटप करून करण्यात आला .या कार्यक्रमाचे संचालन बी.एड. प्रशिक्षणार्थी ऋतुजा पतिंगे यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रद्धा काकडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता बी.एड. प्रशिक्षणार्थी तसेच विद्यार्थी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.