spot_img

श्रीराम शोभायात्रेने दुमदुमली नांदगावनगरी रक्तदान शिबिर, कारसेवकांचाही सम्मान

श्रीराम शोभायात्रेने दुमदुमली नांदगावनगरी
रक्तदान शिबिर, कारसेवकांचाही सम्मान

●मिररवृत्त
●नांदगाव पेठ

येथील पुरातन श्रीरामचंद्र संस्थानच्या वतीने श्रीरामजन्म भूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने संतनगरी नांदगाव पेठ मधून काढण्यात आलेल्या श्रीराम शोभायात्रेने परिसर दुमदुमला होता. राममंदिरापासून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने लक्ष वेधून घेतले होते. शोभायात्रा नंतर महाआरती आणि महाप्रसादाने या धार्मिक कार्यक्रमाचा समारोप झाला.
अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने येथील श्रीरामचंद्र संस्थानने सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संस्थानचे विश्वस्त प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांच्या वतीने कार सेवकांचा सन्मान आणि रक्तदान शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. शेकडोयुवकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन यावेळी रक्तदान केले.तर गावातील कार सेवकांचा शाल व श्रीफळ देऊन सम्मान करण्यात आला.
दररोज सकाळी८ वाजता तसेच सायंकाळी ७ वाजता हनुमान चालीसा एक माळ जप आणि महाआरती करण्यात आली. टाळ मृदुंगाच्या गजरात श्रीराम शोभायात्रेत अनेक भाविक भक्त सहभागी झाले होते.श्रीरामचंद्र संस्थांच्या वतीने भाविकांसाठी सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याने भाविकांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. जय श्रीराम आणि वंदे मातरम च्या घोषणांनी यावेळी आसमंत निनादुन गेला होता.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!