spot_img

PM मोदींच्या फोटोला काळं फासलंः ‘मोदी सरकारची हमी’ यावरून युवक काँग्रेस आक्रमक, जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप

PM मोदींच्या फोटोला काळं फासलंः
‘मोदी सरकारची हमी’ यावरून युवक काँग्रेस आक्रमक
जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप

◆मिररवृत्त
◆नागपूर

केंद्र सरकारने योजनांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी बॅनर्स लावलेले आहेत. मात्र या बॅनर्सद्वारे सरकार जनतेची दिशाभूल करत असून स्वतःचा प्रचार करत असल्याचा आरोप महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी केला आहे.
भारत सरकारची हमी ऐवजी मोदी सरकारची हमी या नावाने प्रचार केला जात आहे. याद्वारे सर्वसामान्यांच्या पैशातून मोदी केवळ स्वतःची प्रसिद्धी करत आहेत. नागपुरात युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करत या पोस्टर्सवर भारत सरकारची हमी असे स्टिकर लावण्यात आले.त्यासोबतच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळे फासले आहे.

◆सरकार स्वतःची जाहिरात करतंय◆

बॅनर्सवर भारत सरकारव्दारा राबवल्या जाणाऱ्या योजनांविषयी अतिशय नगण्य माहिती आहे. सोबतच शासकीय योजनांवर मोदी सरकारची हमी असा उल्लेख करण्यात आला आहे. या योजना कोणासाठी, याचे निकष काय, लाभासाठी कोणाला संपर्क साधायचा अशी कोणतीही कामाची माहिती या बॅनर्समध्ये नसल्याने जनजागृतीचा उद्देश सफल होताना दिसून येत नाही. सरकार स्वतःची जाहिरात करत आहे. त्यामुळे जनतेच्या पैशाची अयोग्य ठिकाणी नासधूस केली जात असल्याने आंदोलन करत असल्याचे कुणाल राऊत यांनी सांगितले.

◆बॅनर्स तात्काळ हटवण्यात यावी◆

भारत लोकशाही राष्ट्र असून देशाचा कारभार हा पंतप्रधानांद्वारे चालवण्यात येतो. मात्र, जाहिरातीत व्यक्तिविशेषाच्या नावाचा उल्लेख केला जात नाही. शासनाच्या योजना या भारत सरकारच्या योजना असतांना मोदी सरकारच्या योजना असा उल्लेख करणे उचित नाही. त्यामुळे मोदी सरकारची हमी असा उल्लेख असलेले बॅनर्स तात्काळ हटवण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचा वतीने करण्यात आली आहे.कोणत्याही व्यक्तिविशेषाच्या नावाचा उल्लेख असलेली बॅनर्स महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेस व्दारे उतरवण्यात येतील आणि त्या विरोधात तीव्र आंदोलन देखील करण्यात येईल, असा इशारा देखील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी दिला आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!