spot_img

श्री ह व्या.प्र मंडळातून घडलाे ! आपणही ध्येय साधावे : क्रीडा उपसंचालक विजय संतान

श्री ह व्या.प्र मंडळातून घडलाे! आपणही ध्येय साधावे :क्रीडा उपसंचालक विजय संतान

◆२९ व्या अ‍ॅक्राेबॅटीक्स जिम्नास्टीक राज्य अजिंकपद स्पर्धेचे उद्घाटन ◆राज्यभरातील खेळाडूंचा सहभाग

◆मिररवृत्त
◆अमरावती

आज जागतिकस्तरावर क्रीडा क्षेत्राला व्यापक स्वरूप प्राप्त होत आहे. यामध्ये भारतीय क्रीडा क्षेत्र सुद्धा स्वत:ला वेगाने अद्ययावत करीत आहे. मात्र यापुर्वी जेव्हा क्रीडा क्षेत्रात साेयी सुविधा नव्हत्या. शासकीय अनुदानाची तरतुद नव्हती त्या काळामध्ये सुध्दा श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देत आवश्यक त्या सेवा सुविधा देण्यावर भर दिला. आज मंडळाचे कार्य जागतिक स्तरावर पाेहचले असून येथील खेळाडू नवनवीन किर्तीमान स्थापीत करीत आहेत. क्रीडा क्षेत्रात एका जबाबदार पदावर कार्यरत असतांना शासनाचे सर्व क्रीडा अनुदान व याेजनांचा लाभ मंडळातील खेळाडूंना देण्यासाठी कटिबद्ध आहे. मंडळामध्ये हाेत असलेल्या राज्यस्तरीय क्रीडा केवळ स्पर्धांचा भाग नसून यातून नवीन खेळाडू उदयास येत आहेत. त्यामुळे खेळाडूंनी आपल्या आवडत्या खेळांमध्ये आपले व्यक्तीमत्व साकार करावे, कारण मी सुद्धा श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातून घडलाे, आपणही ध्येय साधावे असे आवाहन क्रीडा उपसंचालक विजय संतान यांनी केले.

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे २९ व्या अ‍ॅक्राेबॅटीक्स जिम्नास्टीक राज्य अजिंक्यपद स्पर्धांचे आयाेजन दि.२ ते ४ जानेवारी २०२४ करण्यात आले आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, महाराष्ट्र हाैशी जिम्नास्टीक संघटना, अमरावती जिल्हा हाैशी जिम्नास्टीक संघटना व मंडळद्वारे संचालीत डिग्री काॅलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयाेजीत या राज्य अजिंक्यपद अ‍ॅक्राेबॅटीक्स जिम्नास्टीक स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दि.२ फेब्रु. राेजी मंडळाच्या अनंत क्रीडा मंडळ येथे सायं ५ वा करण्यात आले. यावेळी साेहळ्याला उदघाटक म्हणून क्रीडा उपसंचालक श्री विजय संतान उपस्थित हाेते. अध्यक्ष म्हणून मंडळाचे सचिव व अमरावती जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष प्रा. रविंद्र खांडेकर, प्रमुख अतिथींमध्ये मंडळाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत देशपांडे, मंडळाच्या सचिव व महाराष्ट्र हाैशी जिम्नास्टीक संघटनेच्या उपाध्यक्ष प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके, महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव डाॅ. मकरंद जाेशी, स्पर्धा संचालक आशिष सावंत, जिल्हा संघटनेचे कोषाध्यक्ष प्रा.राजेश पांडे, ज्येष्ठ सदस्य मधुकरराव कांबे महाराष्ट्र हौशी जिम्नास्टिकअ‍ॅक्राेबॅटीक्स तांत्रिक समितीचे अध्यक्ष याेगेश पवार आदी मान्यवर उपस्थित हाेते.

२९ व्या अ‍ॅक्राेबॅटीक्स जिम्नास्टीक राज्य अजिंक्यपद स्पर्धांचे उद्घाटन व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दिपप्रज्वलनाने झाले. या स्पर्धेकरीता राज्यभरातून तब्बल १६० खेळाडू, २० पंच व ४० प्रशिक्षक, व्यवस्थापक सहभागी झाले आहे. उद्घाटन सोहळ्याला मार्गदर्शन करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. रविंद्र खांडेकर यांनी आपल्या मार्गदर्शनातून क्रीडा क्षेत्राची आशा पल्लवीत केली. ते म्हणाले, नुकताच सादर झालेल्या देशाच्या अर्थसंकल्पामध्ये क्रीडा क्षेत्र व खेळाडूंच्या उज्वल भवितव्याकरीता भरीव तरतुद करण्यात आली आहे. या संधीचा पुरेपूर लाभ क्रीडा क्षेत्राला, स्थानिक खेळाडू व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या क्रीडा कार्याला मिळवून देवू अशी ग्वाही त्यांनी दिली. मंडळाच्या सचिव प्रा. डाॅ. माधुरीताई चेंडके म्हणाल्या, श्री हव्याप्र मंडळाचे संस्थापक कै. अंबादासपंत वैद्य यांनी मंडळाच्या माध्यमातून युवापीढीला भारतीय पारंपारीक खेळांकडे वळविले. ताेच वसा मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यशस्वीरित्या सांभाळत असून राज्य, राष्ट्रीयस्तरावरील विविध क्रीडा स्पर्धांचे आयाेजनाद्वारे युवापीढीला खेळांद्वारे सक्षम करण्याचे समाधान व कार्य अविरत सुरू असल्याचे मत व्यक्त करीत २९ व्या अ‍ॅक्राेबॅटीक्स जिम्नास्टीक राज्य अजिंक्यपद स्पर्धांमध्ये सर्व सहभागी खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्यात. यानंतर व्यासपीठावर उपस्थित मंडळाचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत देशपांडे, डाॅ. मकरंद जाेशी सह इतर मान्यवरांनी मनाेगत व्यक्त करीत सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमादरम्यान आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक पंच संजय हिराेळे, प्रविण शिंदे, राहुल ससाणे, सुनील रणपिसे, प्राची पारखी, अक्षय अवघाते, ज्याेती शिंदे एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्ण रजत व कांस्यपदक प्राप्त खेळाडू, व्यवस्थापक प्रा.आशिष हटेकर यांना सन्मानीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव डाॅ. मकरंद जाेशी यांनी करीत श्री हव्याप्र मंडळाचे कार्याची प्रशंसा केली व आपल्या आवडत्या क्रीडा क्षेत्रातून उज्वल भवितव्य साकारा असे आवाहन त्यांनी खेळाडूंना व स्पर्धकांना केले. संचलन जिंम्यास्टीक विभाग प्रमुख प्रा. आशिष हाटेकर यांनी तर आभार डाॅ. मधुकर बुरनासे यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वितेकरिता डाॅ. संजय तिरथकर, कमलाकर शहाणे, अक्षय अवघाते, सचिन काेठारे, प्रा.नंदकिशोर चव्हाण डॉ. ललित शर्मा डाॅ. मनोज काेहळे,प्रा.प्रतीक कोंडे डॉ . किरण राहणे प्रा.अंशू कुमारी,डाॅ. धनंजय विठाळकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला मोठ्या संखेने खेळाडू, विद्यार्थी, पालकवर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!