spot_img

समृद्धी महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; १० जनावरे जागीच ठार

समृद्धी महामार्गावर तीन वाहनांचा अपघात; १० जनावरे जागीच ठार

◆मंगरूळ चव्हाळा जवळील घटना
◆महामार्ग वाहतूक पोलिसांसह मंगरूळ चव्हाळा पोलीसांनी त्वरित घटनास्थळी पोहचुन केली तात्काळ वाहतुक मोकळी

◆मिररवृत्त
◆नांदगाव खंडेश्वर

समृध्दी महामार्गाने नागपूरहून मुंबईकडे गोवंश नेत असताना ट्रकमधील दहा जनावरे जागीच ठार झाली, तर दोन्ही चालक गंभीर जखमी झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर मंगरूळ चव्हाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चॅनल नंबर १५२ येथे रविवारी पहाटे ५:३० वाजता घडली. दरम्यान, देवगाव येथील वाहतूक पोलिसांनी गोवंश पकडण्यासाठी दोन ट्रक प्रथम या समृद्धी महामार्गावर आडवे केले असल्याची माहिती पुढे आली आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर एमएच ४० सीडी ४८८१ क्रमांकाचा ट्रक नागपूरहून मुंबईकडे गोवंश घेऊन जात होता. यादरम्यान समोरील असलेला कन्टेनर (एमएच ४३ बीपी ४८१५) धडक देत ट्रक. समोरील बाजूने जबर धडक देऊन नुकसान केले. तसेच एमएच १२ पीक्यू ९४७५ क्रमांकाच्या ट्रकलादेखील जबर धडक दिली. गोवंश असलेल्या ट्रकमधील १० जनावरे या अपघातात जागीच ठार झाली. ट्रकमध्ये एकूण ३८ गोन्हे व बैल एकमेकांना दोरांनी बांधले होते देवगाव येथील महामार्ग वाहतूक पोलिसांकडे ही हद्द येत असल्याने येथील पोलिसांनी रात्री पेट्रोलिंग करताना दिसताच गोवंश वाहतुक करणारा ट्रक चालकाला पोलीस पकडतील यांचा अंदाज आल्याने चालकाने वाहन पळवण्यासाठी अती वेगाने चालविल्याचे कारणास्तव दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी झाले. डॉ. पंजाबराव देशमुख गौशाळा (कणी मिर्झापूर) येथे गोवंश आणून सर्व जनावरे पोलिस मित्र व कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरक्षित उतरवल्याची माहिती मंगरूळ चव्हाळ्याचे ठाणेदार रवींद्र बारड यांनी दिली. आप्पा सुर्यभान वनवे वय ३१ वर्ष व्यवसाय ड्रायव्हर रा. विठ्ठलनगर ता. गेवराई जि. बिड यांचेशी संपर्क केला असता असे समजले की साईराज लॉजीस्ट्रीक प्राव्हेट लिमीटेड कंपनि मधील ट्रक क्र. एम एच ४३ बी.पी. ४८१५ वर ड्रायव्हर म्हणुन २०,००० रु महीण्याने काम करतात ते जास्त लोकल ट्रिप मारतात कधी-कधी ते बाहेर राज्यात तसेच मुबंई, पुणे येथे त्यांचे ट्रकला जे भाडे भेटन ते मारीत असतात दिनांक ३/२/२०२४ रोजी संध्याकाळी ०७.०० नागपूर येथुन ते ट्रकमधे तांदुळ भरुन पनवेल मुंबई करीता समुध्दी महामार्गानी निघाले असतांना रात्री ११.३० वा ते नांदगाव खंडेश्वर येथिल पेट्रोल पंप येथे झोपनेसाठी वाहन थांबवुन नंतर ४/२/२०२४ रोजीच मुंबई कडे घेवुन निघाले असतांना काही अंतरावर अंदाजे ८ ते ९ किलो मिटर अंतरावर त्यांनी त्यांची गाडी रोडच्या डावे बाजुला तिस-या लेन वर चालवित असता मागुन दोन नंबर लेन मधे भरधाव वेगाने येणा-या ट्रक नी एक नंबर लेन वरील ट्रकला अगोदर धडक दिली त्यानंतर त्याचा ट्रक माझे ट्रकच्या कॅबिन ला जबर धडक दिली
त्यामधे त्यांचे गाडीचे नुकसान झाले व गाडीमधिल मालाचे नुकसान झाले. त्यानंतर मंगरुळ चव्हाळा पोलीस व समुध्दी महामार्गावरील कर्मचारी आले व त्यानी रोडवरील ट्राफिक हटविले ट्रक क्रमांक एम एच ४० सी.डी ४८८१ चे वाहनामधे जनावरे होते त्या चालकाने आपला ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजी पने चालवुन माझे ट्रक चा अपघात घडुन आनला. व एक नंबर वरील लेन वरील ट्रक क्रमांक एम.एच १२ पि.क्यु ९४७५ ला सुध्दा जबर धडक देवुन अपघात घडुन आनला व त्याचे ट्रक चे सुध्दा नुकसान केले. असे त्यांनी प्रतिनिधी बोलतांना आपले मत व्यक्त केले पुढील तपास मंगरुळ चव्हाळा पोलीस करित आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!