spot_img

जनतेकडून रस्ता सुरक्षा संदर्भात अभिप्राय मागणार- राजाभाऊ गीते,निधीचीही कमतरता पडू देणार नसल्याचे प्रतिपादन

जनतेकडून रस्ता सुरक्षा संदर्भात अभिप्राय मागणार- राजाभाऊ गीते

निधीचीही कमतरता पडू देणार नसल्याचे प्रतिपादन

●मिररवृत्त
●अमरावती

रस्ता सुरक्षाला यापुढे शासनाकडून निधीची कमतरता पडणार नसून रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत तसेच शासनाच्या जिल्हा नियोजन विकास निधी मधून रस्ता सुरक्षा करिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे.याकरिता जनतेकडून मोठ्या प्रमाणात अभिप्राय मागविण्यात येणार आहे. कुठल्या रस्त्यावर कुठले अपघात प्रवणक्षेत्र आहे त्याचा आढावा जनतेच्या माध्यमातून घेण्यात येऊन अपघात मुक्त जिल्हा करण्याचे ध्येय या विभागाने स्वीकारलेले आहेअसे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते यांनी केले.
रस्ता सुरक्षा अभियाना निमित्य ऑटो रिक्षा , स्कूल बस वाहन चालकांचे मोफत आरोग्य , नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रांगणात दिनांक 2 व 3 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.
वाहनावरील अपघात हे अति वेगाने होतात , ही बाब लक्षात घेता आपल्या दैनंदिन जीवनात कामकाजाचे नियोजन, व्यवस्थापन करीत मर्यादेपेक्षा जास्त गती न ठेवता वाहन चालविल्यास सर्वसामान्य नागरिकांनी वाटचाल केल्यास , मानवी जीवन सुरक्षित होण्यासह शहर, राज्य तसेच देश अपघात मुक्त व अपघात विरहित होण्यास ही बाब निश्चितच आशादायी ठरणारी राहील.या द्विदिवसीय शिबिरात अधिका-अधिक संख्येने वाहन चालकांनी लाभ घेण्याचे आवाहन सुद्धा यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते यांनी उद्घाटनपर बोलताना व्यक्त केले.
यावेळी दिलीपबाबू इंगोले कोषाध्यक्ष श्री शिवाजी संस्था अमरावती, नितीनभाऊ मोहोड संस्थापक अध्यक्ष विदर्भ ऑटो रिक्षा संघटना , डॉ. पद्माकर सोमवंशी , अजय साखरे जिल्हा एड्स नियंत्रण, राज बागरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वैभव गुल्हाने मोटार वाहन निरीक्षक यासह जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर , विजय गावंडे , प्रदीप गुडदे तसेच अधिकारी , कर्मचारी व ऑटो रिक्षा व स्कूल बस वाहनचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऋषिकेश गावंडे तर संचालन व आभार भुपेश दळवी यांनी मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!