तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विहिरी ड्रायझोन मधून काढा
●शेतकऱ्यांसमवेत तीव्र आंदोलन करण्याचा सागर भवते यांचा इशारा
●मिररवृत्त
●तिवसा
भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा कार्यालयाचे वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेमुळे तिवसा तालुक्यातील 18 गावातील विहीर लाभार्थी शेतकऱ्यांची ड्रायझोन मध्ये दाखवत असून गरीब शेतकरी शासनाच्या विहीर योजने पासून वंचित राहत असल्याचा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीचे सागर भवते यांनी केला आहे.
ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी शासनाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने व महात्मा गांधी रोजगार हमी योजना मार्फत शेतकऱ्यांना विहिरीचा लाभ दिला जातो परंतु भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा कार्यालयाचे वतीने करण्यात आलेल्या सर्व्हेमुळे तिवसा तालुक्यातील 18 गावातील शेतकऱ्यांची शेती ड्रायझोन मध्ये दाखवत असून सदर शेतकरी यामुळे विहीर योजने पासून वंचित राहत आहे त्यामुळे सदर गंभीर बाबीची दखल घेत वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक यांची भेट घेऊन गरीब शेतकऱ्यांची शेती ड्रायझोन मधून काढत त्यांना विहीर योजनेचा लाभ देण्यासाठी अडथळा दूर करावा अशी मागणी केली आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा कार्यालयाला निवेदन सादर करतेवेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांचे सह जिल्हा सदस्य विनोद खाकसे, अमरावती तालुका अध्यक्ष मयुरेश इंगळे, तिवसा महासचिव अमोल जवंजाळ, शहर उपाध्यक्ष शैलेश बागडे उपस्थित होते.
‘गरीब शेतकऱ्यांच्या विहिरीसाठी भूजल सर्वेक्षण कार्यलयासमोर तीव्र आंदोलन छेडणार- सागर भवते*
भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणाचे वतीने करण्यात आलेला सर्व्हे पुर्णतः सदोष असून त्यामुळे अनेक शेतकरी विहिर योजनेपासून वंचित राहत आहे. अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या वेदनेची जाणीव नसल्याने हा प्रकार झाला आहे. वंचित बहुजन युवा आघाडी गरीब शेतकऱ्यांच्या पूर्णतः पाठीशी असून यावर मार्ग न निघाल्यास भूजल सर्वेक्षण कार्यलयासमोर तीव्र आंदोलन छेडणार अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी दिली आहे’