spot_img

पूनम पांडेचे वयाच्या 32 व्या वर्षी निधन ,अभिनेत्री गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी झुंज देत होती

पूनम पांडेचे वयाच्या 32 व्या वर्षी निधन

●अभिनेत्री गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाशी झुंज देत होती

●मिररवृत्त
●मुंबई

आपल्या बोल्डनेस आणि वादांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री पूनम पांडे हिचे आकस्मिक निधन झाले आहे. तिच्या व्यवस्थापकाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पूनम गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने त्रस्त असल्याचे सांगितले जात आहे.ही बातमी समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे.
३२ वर्षीय पूनम पांडेला गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होता. अभिनेत्रीच्या टीमने आपल्या वक्तव्यात याचा खुलासा केला आहे. पूनम पांडेच्या टीमने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून सोशल मीडियावर अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यात लिहिले आहे की, ‘आजची सकाळ सर्वांसाठी खूप कठीण आहे. आम्ही आमच्या लाडक्या पूनमला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने गमावल्याचे जाहीर करताना दुःख होत आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी पूर्ण प्रेम आणि दयाळूपणा दिला. या दुःखाच्या काळात, आम्ही चाहत्यांकडून गोपनीयतेची विनंती करतो जेणेकरून आम्ही त्यांना प्रेमाने लक्षात ठेवू शकू.’
पूनम पांडेच्या इन्स्टाग्रामवरून शेअर केलेल्या या पोस्टने सोशल मीडिया यूजर्सना हैराण केले आहे. अनेक युजर्सनी पोस्टवर कमेंट करत हा विनोद आहे का, असा सवाल केला आहे. पूनमची टीम ही युक्ती एखाद्या प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी वापरत आहे का? तिला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबद्दल जनजागृती करायची आहे की तिचे खाते हॅक झाले आहे का?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पूनमला काही काळापूर्वी कॅन्सरने ग्रासले होते. हा शेवटच्या स्टेजमध्ये होता. ती यूपीमधील तिच्या गावी उपचार घेत होती. अंतिम संस्कारही तिथेच होणार आहेत. याबाबत अधिक तपशील मिळणे बाकी आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!