सार्सी गाईची येथे प्रजासत्ताक दिनी सैनिकांचा सन्मान
◆मिररवृत्त
◆अमरावती
जि प उच्च प्राथमिक मराठी शाळा सार्सी गाईची येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक संदीप खडेकार यांचे हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गावातून विद्यार्थ्यांची देशभक्तीपर घोषणांच्या गजरात प्रभातफेरी काढण्यात आली. गावातील अनेक नागरीक प्रभातफेरीत सामील होते.
याप्रसंगी जि. प. शाळेत गावातील सैन्यदलात सेवा देत असलेल्या सैनिकांचा आजी व माजी सैनिक तथा सुरक्षा दलाच्या जवानांचा तथा पोलीस यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. सैन्यदलात सिक्कीम येथे सेवा देत असलेले सैनिक वैभव विटोले, काश्मीर येथे सेवा देत असलेले शंकरराव सहारे, रेल्वे सुरक्षा दलाचे माजी पोलिस विजयराव वानखडे, महाराष्ट्र पोलीस दलातील माजी पोलीस चंद्रशेखर वानखडे यांचा देशसेवेसाठी कृतज्ञता म्हणून शाळेचे मुख्याध्यापक संदीप खडेकार, कल्पनाताई कडू अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सार्सी व रिना मंजू सरपंच सार्सी गाईची यांचे हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला सत्कारमूर्तींचे कुटुंबीय व गावातील शेकडो स्री पुरूष नागरिक उपस्थित होते. अतिशय उत्साहात सर्व कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु. वर्षा लामसे व अलका दुधाट यांनी योगदान दिले.