spot_img

स्व.राजीव गांधी अपंग निवासी( तांत्रिक) कर्मशाला डवरगाव येथे प्रजासत्ताक दिन साजरा

स्व.राजीव गांधी अपंग निवासी( तांत्रिक) कर्मशाला डवरगाव येथे प्रजासत्ताक दिन साजरा
●मिररवृत्त
●डवरगाव /प्रदीप टेकाडे

अमरावती तालुक्यातील डवरगाव येथे स्व राजीव गांधी अपंग निवासी तांत्रिक कर्मशाळा येथे 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मशाळेच्या अधीक्षक सुचिता परांजपे या होत्या होत्या.सुचिता परांजपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर सुचिता परांजपे यांनी विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितले शिवाय उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.साक्षी परांजपे, वेदांत परांजपे, प्रफुल निस्ताने (निदेशक), यांनी संभाषण केले.रवींद्र जवंजाळ (निदेशक), जयकुमार तायडे, मोहन परांजपे, गजानन बन्सोड यांनी सुद्धा यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी पंजाबराव गादे यांचेसह सर्व पदाधिकारी,विद्यार्थी आवर्जून उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!