spot_img

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून टीम अग्नी ची स्थापना ,विद्यार्थ्यांना करणार शैक्षणिक सहकार्य

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून टीम अग्नी ची स्थापना

◆विद्यार्थ्यांना करणार शैक्षणिक सहकार्य

◆मिररवृत्त
◆अमरावती

महाराष्ट्रातील बौद्ध समाजाच्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सहकार्य तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याच्या उद्देशाने प्रजासत्ताकदिनी टीम अग्नी – आंबेडकराईट ग्र्याज्यूएट्स नेटवर्क ऑफ इंडिया ची स्थापना अमरावती येथे करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शन टीम अग्नी चे अध्यक्ष व राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध वक्ता भीम बारसे यांनी केले.
बौद्ध समाजाचा सामाजिक, राजकीय, आर्थिक विकास करण्याकरिता विविध संघटना व पक्ष काम करत आहेत. परंतु समाजाचे विद्यार्थी त्यांचे शिक्षण योग्य पद्धतीने घेत आहेत की नाही, त्यांचा सर्वांगीण विकास होत आहे की नाही यावर काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांवर व त्यांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने बौद्ध समाजाचा विद्यार्थी समूह असणे आवश्यक असल्याचे भीम बारसे यांनी यावेळी सांगितले आणि टीम अग्नीच्या स्थापनेची संकल्पना मांडली.
या कार्यक्रमाची सुरूवात माधुरी अंबादे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून केले. प्रास्ताविक आशुतोष इंगळे, संचालन चेतन हंबर्डे तर आभार प्रदर्शन श्वेता नागदिवे यांनी केले. कार्यक्रमामध्ये काजल पाखले, रुपाली आठवले, कृपली आठवले, अक्षिता हरले, दीपक सोनवणे, यश धांदे, प्रगती गणवीर, सुप्रिया डोंगरे, साक्षी मोहोळ, सुप्रिया वानखडे यांच्यासह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!