spot_img

शेतकऱ्यावर अस्वलीचा प्राणघातक हल्ला, चोबीता येथिल घटना, शेतकरी गंभीर जखमी

शेतकऱ्यावर अस्वलीचा प्राणघातक हल्ला
◆चोबीता येथील घटना,शेतकरी गंभीर जखमी

◆मिररवृत्त
◆काटकुंभ
●अबोदनगो चव्हाण●

चोबिता शेतशिवारात जनावरे चराई करत असतांना अचानक अस्वलीने केलेल्या हल्ल्यात शेतकरी बालाजी सोमा बेठेकर(४०) रा.चोबिता गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान घडली. जखमी अवस्थेत असलेल्या शेतकऱ्याला चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्राथमिक उपचारानंतर रुग्णवाहिकेद्वारे त्याला अमरावती येथील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या त्या शेतकऱ्याची प्रकृती स्थिर असुन अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या हल्ल्यात शेतकऱ्याच्या डाव्या बाजूने हात आणि डोक्यावर गंभीर ईजा झाली असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना घटनेबाबत माहिती देण्यात आली असून घटनेचा पंचनामा देखील करण्यात आला.

‘शेतकऱ्यावर अस्वलीने केलेल्या हल्ल्याबाबत आमचे प्रतिनिधी अबोदनगो चव्हाण यांनी जारीदा वनपरिक्षेत्र अधिकारी मसूद खान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घटनेबाबत चिंता व्यक्त केली असून शेतकऱ्याच्या प्रकृतीवर देखील वनविभाग लक्ष ठेवून असल्याचे सांगितले. वन कायद्याच्या नियमानुसार पीडित शेतकऱ्याला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील यावेळी मसूद खान यांनी दिले.’

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!