spot_img

आज रविराज देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उदघाटन सोहळा ,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार उदघाटन

आज रविराज देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा उदघाटन सोहळा

◆भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार उदघाटन

◆मान्यवरांचीही राहणार उपस्थिती

◆मिररवृत्त
◆अमरावती

भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तसेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविराज देशमुख यांच्या अमरावती येथील जनसंपर्क कार्यालयाचे आज सायंकाळी ६ वाजता उदघाटन होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन होणार असून पक्षाचे पक्षाचे अन्य मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत.
रविराज देशमुख भाजपचे सक्रिय पदाधिकारी असून तिवसा विधानसभा क्षेत्राचे ते भावी उमेदवार आहेत.केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी व अन्यायग्रस्त जनतेला न्याय मिळवून देण्याकरीता जनसंपर्क कार्यालय उघडण्यात येत असून मतदारसंघातील जनतेसाठी हे जनसंपर्क कार्यालय सदैव सेवेत असणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर आज सायंकाळी (दि.२६) ६ वाजता माऊली कॉम्प्लेक्सं, मालटेकडी मागे,जिल्हा होमगार्ड आफिस समोर, अमरावती येथे या कार्यालयाचे थाटात उदघाटन होणात आहे.
या उदघाटन समारंभाला अध्यक्ष म्हणून वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आ.अरुण अडसड, भाजपा अमरावती जिल्हाध्यक्ष खा. अनिल बोंडे, पालकमंञी तथा भाजपा शहर अध्यक्ष आ.प्रवीण पोटे,खा.रामदास तडस,भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते ओबीसी मोर्चा प्रभारी प्रदेशाध्यक्ष आशिष देशमुख, विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठीकर,आ.रामदास आंबटकर,माजी मंत्री जगदीश गुप्ता,आ. प्रताप अडसड यांचे सह भाजप चे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थितअसणार आहेत.सर्वांनी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रविराज देशमुख यांनी केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!