spot_img

वंचित बहुजन आघाडी नांदगाव पेठ शाखेच्या नामफलकाचे उदघाटन

वंचित बहुजन आघाडी नांदगाव पेठ शाखेच्या नामफलकाचे उदघाटन

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

वंचित बहुजन आघाडी नांदगाव पेठ शाखेच्या नामफलकाचे नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन करण्यात आले. शासकीय वसाहत मध्ये आयोजित एका भव्य कार्यक्रमात अनेक युवकांनी पक्षात प्रवेश करून बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करण्याची शपथ घेतली.यावेळी शाखाध्यक्ष म्हणून सुरज खंडारे यांची नियुक्ती करण्यात आली.
या नामफलकाच्या उदघाटन प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशोक मोहोड,तालुकाध्यक्ष राहुल भालेराव,रघुनाथ मनोहरे,जिल्हा सचिव नंदकुमार खंडारे,तालुका महासचिव चंदू मोहोड, बाबाराव गायकवाड,नांदगाव पेठ शाखाध्यक्ष सुरज खंडारे यांचेसह मान्यवर मंडळी उपस्थित होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर,तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला वंदन करून मान्यवरांच्या हस्ते नामफलकाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करतांना समाजातील अनुयायांना मार्गदर्शन केले. युवकांनी जास्तीत जास्त संख्येने वंचित बहुजन आघाडी मध्ये सामील होऊन तळागाळातील वंचित घटकांसाठी प्रामाणिक कार्य करण्याचे आवाहन केले.
शाखाध्यक्ष सुरज खंडारे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नांदगाव पेठच्या कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष पदी श्याम मेश्राम,महासचिव पदी अंकुश मोहोड, सचिवपदी निखिल धुर्वे,सदस्यपदी अजय कांबळे, प्रेम कावरे, प्रदीप दाभाडे,प्रेम कांबळे, गोपाल वानखडे,दिनेश कांबळे, राजू गडलिंग,विजय गडलिंग, प्रकाश मेश्राम,विनोद कावरे, ईश्वर बागडे,विनोद खंडारे,बाबूलाल वानखडे,योगेश मेश्राम आदींचा समावेश करण्यात आला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!