spot_img

स्नेहसंमेलनामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास-कविता डांगे,जि.प.हायस्कुल येथे स्नेहसंमेलनाचे थाटात उदघाटन ,विविध मान्यवरांची उपस्थिती

स्नेहसंमेलनामधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास-कविता डांगे

◆जि.प.हायस्कुल येथे स्नेहसंमेलनाचे थाटात उदघाटन
◆विविध मान्यवरांची उपस्थिती

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

शिक्षणकार्याशिवाय अतिरिक्त भार असतांना सुद्धा शिक्षकवृंद आपल्या कर्तव्यात कोणतीही कसर शिल्लक ठेवत नाही.विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्यातील सुप्त गुणांना पुढे आणून विद्यार्थी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवत आहे आणि अश्या स्नेहसमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे कार्य अतिशय चोख आणि प्रामाणिकपणे जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय करते आहे हे भूषणावह असल्याचे प्रतिपादन स्नेहसमेलनाच्या उदघाटन प्रसंगी सरपंच कविता विनोद डांगे यांनी केले.
जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने स्नेहसमेलनाचे आयोजन करण्यात आले असून मंगळवारी सकाळी ११ वाजता सरपंच कविता डांगे यांच्या हस्ते उदघाटन पार पडले. यावेळी या स्नेहसमेलनाला अध्यक्ष म्हणून ग्रामविकास अधिकारी हर्षदा बोंडे यांची उपस्थिती होती तर तर प्रमुख अतिथी म्हणून स्व.दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दरणे,जेष्ठ पत्रकार राजन देशमुख, मंगेश तायडे, प्राचार्य देवेंद्र ठाकरे, उपप्राचार्य रमेशराव वानखडे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश गाडगे, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष प्रवीण जामोदकर व माजी अध्यक्ष अरुण राऊत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला हारार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रास्ताविक मध्ये प्राचार्य देवेंद्र ठाकरे यांनी हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. शाळेचे विद्यार्थी गुणवत्ता यादीपासून तर विविध खेळ आणि कलागुणांनी राष्ट्रीय स्तरावर शाळेचे नेतृत्व करत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.पुसदकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दरणे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की,शिक्षक हे विद्यार्थ्यांसोबत समाज घडविण्याचे कार्य करतात, चांगल्या व्यक्तीची ब्रांडिंग करण्याचे कार्य शिक्षकवर्ग करतात त्यामुळे समाजात जे ही आज मोठे आहेत त्यामागे आपल्या शिक्षकांचा मोठा वाटा असतो असे ते यावेळी म्हणाले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष हर्षदा बोंडे यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तसेच शाळेसाठी जी मदत लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले शिवाय विद्यार्थ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी शुद्ध पाण्याचे यंत्र देखील लावण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी संगीतले.
विचारपीठावर असलेले राजन देशमुख, मंगेश तायडे, यांनी सुद्धा आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.विद्यार्थ्यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पुष्प प्रदर्शनी, हस्तकला स्पर्धा, डिश डेकोरेशन तसेच रांगोळी स्पर्धेचे देखील यावेळी उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.उल्हास घारड,शिक्षिका आशिया शेख यांनी केले तर आभार उपप्राचार्य रमेश वानखडे यांनी मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!