उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविलेल्या श्रीराम मूर्तीचे हिंगासपुरे नगरात पूजन
●मिररवृत्त
●अमरावती
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुलोम संस्थेच्या वस्तीमित्रांकरिता पाठविलेल्या कोदंडधारी श्रीराममूर्तीचे पूजन मोठ्या उत्साहात वस्तीमित्र मनीष जाधव यांच्यावतीने हिंगासपुरेनगर येथे पार पडले.
अनुलोम संस्थेचे संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात काम चालते. संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते अनुलोमचे वस्तीमित्र म्हणून काम करतात. एक वस्तीमित्र त्यांच्या वस्तीतील पंधरा हजार लोकाचे नेतृत्व करतात. या सर्व सामाजिक क्षेत्रातील नेतृत्वाचा यथोचित सन्मान देवेंद्र फडणवीस यांनी श्रीराम मूर्ती पाठवून केला. हिंगासपुरेनगर वस्तीचे वस्तीमित्र मनीष जाधव यांनी शोभायात्रा काढून श्रीराम मूर्तीचे स्वागत केले.यावेळी वस्तीतील वातावरण राममय झाले होते. त्यानंतर वस्तीमित्र मनीष जाधव यांचे घरी श्रीराम मूर्ती पूजन व श्रीराम मूर्ती प्रदान सोहळा पार पडला. यावेळी स्वामी तायडे याने मारुती स्तोत्र तर श्लोक व्यवहारे याने रामरक्षा स्तोत्र म्हटले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अण्णाजी डाके हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीकांत काळे,ऍड डांगे,नितीन तायडे,अनुलोम उपविभागजनसेवक अक्षय डोईजड, अनुलोम भागजनसेवक प्रशांत सिसोदिया, वस्तीमित्र मनीष जाधव हे उपस्थित होते. सर्वप्रथम प्रभू श्रीराम प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवर व महिला पुरुष यांच्याहस्ते श्रीराम मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले.
त्यानंतर प्रभू श्रीराम यांची आरती करून प्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वस्तीमित्र मनीष जाधव यांना कोदंडधारी श्रीराममूर्ती प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राचे वाचन अनुलोम भागजनसेवक प्रशांत सिसोदिया यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रीती जाधव यांनी केले. कार्यक्रमाला वस्तीतील नितीन मांडवे,नितीन सावळे,काकपुरे,युगांधर व्यवहारे,गजानन रुद्रकार,चवरे,मोहन ठाकरे,राहुल इंगळे,पूजा तायडे,किरण डवले,श्वेता व्यवहारे, स्वाती येडले, कौसल्या जाधव,माधुरी गायकवाड,सौ काकपुरे,सौ लोखंडे,सौ रुद्रकार,सौ डाफ,सौ डेहणकर,श्री जाधव तसेच महिला,पुरुष,व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.