spot_img

कुलगुरू पदाच्या निवड प्रक्रियेत घोळ? ,युवासेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण दिधाते यांचा आरोप

कुलगुरू पदाच्या निवड प्रक्रियेत घोळ?

◆युवासेनेचे जिल्हा प्रमुख प्रवीण दिधाते यांचा आरोप

◆२० ला होणारी निवड प्रक्रिया रद्द करा

◆मिररवृत्त
◆अमरावती

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी सुरू असलेल्या निवड प्रक्रियेत घोळ होत असल्याची तक्रार युवसेनेने केली असून शैक्षणिक पात्रता पूर्ण न करणाऱ्या उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड होत करण्यात आल्याने युवासेनेचे अमरावती जिल्हा प्रमुख प्रवीण दिधाते यांनी निवड समितीवर ताशेरे ओढले असून २० जानेवारी रोजी होणारी कुलगुरू निवड प्रक्रिया रद्द करा अन्यथा याविरोधात आंदोलनात्मक भूमिका घेणार असल्याचा इशारा दिधाते यांनी दिला आहे.
कुलगुरू पदाकरीता दि. १७/११/२०२३ रोजी जाहीरात देण्यात आली होती. त्याअनुषंगाने १५ उमेदवारांनी जाहीरातीनुसार अर्ज केले होते त्यानुसार निवड समीतीने ज्या ४३ उमेदवारांची निवड केली त्यांची ११ व १२ जानेवारी रोजी मुलाखत घेण्यात आली मात्र ४३ पैकी १८ उमेदवारांची शैक्षणीक पात्रता पूर्ण नाही. उमेदवारांकडे संशोधन प्रकल्प नाही, संशोधन पेपर नाही व १० वर्षाचा प्राध्यापकांचा अनुभव नाही जे उमेदवार निवडलेले आहे त्यापैकी १८ उमेदवार हे प्राचार्य श्रेणीतुन येतात.सद्यस्थितीत त्यांचे एजीपी ९००० आहे व ७ व्या वेतन आयोगाप्रमाणे एल-१३ या श्रेणीत आहे. प्राध्यापक पदाची एल-१४ ही श्रेणी आहे म्हणजेच ते प्राध्यापक नाही. प्राध्यापक पदावरुन त्यांना सद्यस्थितीत सहाय्यक प्राध्यापक पदाच्या श्रेणीत टाकण्यात आले आहे. त्यामुळे ते भुतकाळात काय होते याला महत्व नाही वर्तमान स्थितीमध्ये ते सहाय्यक प्राध्यापक आहे यामुळे ते कसे काय पात्र ठरु शकतात हा संशोधनाचा विषय आहे?
मुलाखती साठी पात्र ठरलेले डॉ. शंकरराव अंभोरे प्राचार्य (श्रेणी सहाय्यक प्राध्यापक) कोहीनूर कॉलेज, खुलदाबाद, यांना १ वर्षांचा प्रशासकीय अनुभव आहे. पात्रतेनुसार कमीत कमी ५ वर्षाचा प्रशासकीय अनुभव पाहीजे असे जाहीराती मध्ये नमुद आहे तसेच डॉ. शंकरराव अंभोरे हे ६० वर्ष पूर्ण होऊन सेवानिवृत्त झाले आहे व कोहीनूर कॉलेज, खुलदाबाद येथे ६१ व्या वर्षी सहाय्यक प्राध्यापक या श्रेणीत प्राचार्य झाले आहे हे कसे काय ? अश्या प्रकारे १८ उमेदवार हे सहाय्यक प्राध्यापक या श्रेणीतुन आलेले आहे त्यांची मुलाखती करीता निवड करणे म्हणजे नियम व पात्रतेचे सरळ सरळ उलंघन करणे होय असा आरोप प्रवीण दीधाते यांनी आपल्या निवेदनात केला आहे.
शिवाय डॉ. मिलींद बारहाते हे सक्रीय राजकारणी आहे त्यांचे नाव पदवीधर मतदार संघातुन निवडणुकीसाठी सुरू होते मिलींद बारहाते यांचे नाव कुलगुरू होणार असल्याची वृत्तपत्रात बातमी आहे त्यामुळे गोपनियतेचा भंग होत नाही का? असा सवाल सुद्धा यावेळी पुढे येत आहे.डॉ. मिलीद बारहाते सोबत जे चार उमेदवार निवडले गेले ते सर्व डमी उमेदवार आहेत कारण डॉ. ए.एम. महाजन हे निवृत्त झाले आहे त्यामुळे त्यांची मुलाखत जरी घेतली तरी त्यांना कुलगुरू करता येत नाही कारण त्यांची सेवा ३१ डिसेंबर २०२३ रोजीच संपुष्टात आली आहे व बाकी उमेदवार सुध्दा स्थानिक न घेता बाहेरचे घेण्यात आले आहे त्यांना विद्यापीठाची कोणतीच माहिती नाही असे उमेदवार निवडल्या गेले.या सर्व करणाने सदर निवड प्रक्रिया स्थगित करुन पुन्हा जाहीरात देऊन योग्य पध्दतीने व विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या अटी व शर्थी नुसार आणि प्रकाशित केलेल्या जाहीराती नुसार सर्व पात्रता धारण करणा-या व्यक्तीची निवड करावी व स्थानिक उमेदवारास प्राधान्य दिल्यास विद्यापिठातील विभाग व पाचही जिल्हातील महाविद्यालये चांगल्या प्रकारे विकसीत करु शकतात. कुलगुरूपदाची निवड प्रक्रीया रद्द करुन कुलगुरू पद भरण्याकरीता नव्याने जाहीरात देऊन निवड प्रक्रीया सुरू करावी तसेच दिनांक २० जानेवारी रोजी होणारी कुलगुरू पदाची निवड प्रक्रीया ताबडतोब रद्द करावी अन्यथा युवासेनेच्या वतीने आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल असा इशारा राज्यपाल यांना दिलेल्या निवेदनातून प्रवीण दिधाते यांनी केला आहे यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पडोळे देखील उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!