spot_img

डायट येथे नवोपक्रम स्पर्धेतील बक्षीस वितरण ,पुरस्कारातून प्रेरणा निर्मिती -प्राचार्य मिलिंद कुबडे

डायट येथे नवोपक्रम स्पर्धेतील बक्षीस वितरण

◆पुरस्कारातून प्रेरणा निर्मिती -प्राचार्य मिलिंद कुबडे

◆मिररवृत्त
◆अमरावती

राज्याच्या शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2023 -24 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय अमरावती येथे दिनांक 16 जानेवारी रोजी पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रादेशिक विद्या प्राधिकरण अमरावतीचे प्राचार्य मिलिंद कुबडे, प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर, अधिव्याख्याता मधुमती सांगळे, डॉ.राम सोनारे, पवन मानकर ,डॉ.विकास गावंडे ,अधीक्षक श्री ठाकरे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद कुबडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषण दरम्यान शासकीय सेवेत असताना स्पर्धा असणे गरजेचे आहे. स्पर्धेतून मिळालेल्या यशामुळे व्यक्तीमध्ये स्फूर्ती चढते. नवीन शैक्षणिक धोरणात कृतीस प्राधान्य दिले आहे . त्यामुळे कृतिशील शिक्षकांपासून इतरांना प्रेरणा मिळत असल्याचे प्रतिपादन नवोपक्रम वितरण सोहळ्यादरम्यान केले.
यावेळी जिल्हास्तरावरील प्राथमिक शिक्षक गटातील अर्चना मेश्राम,विरेंद्र ब्राम्हण, डॉ. निलेश इंगोले,गोपाल अभ्यंकर, बबलू कराळे,श्रीकृष्ण उघडे, कांचन भांगे माध्यमिक शिक्षक गटातून सुधीर केने,श्रीकांत निकम,अतुल पडोळे, शुभांगी सवाई तर विभागीय स्तरावरील विषय साधनव्यक्ती गटातून श्रीनाथ वानखडे, मिनाक्षी खरटमोल ,स्वाती नाचोने ,मोतीराम जाधव ,निता देशमुख ,स्वाती ढोबळे ,धनराज मेहल्डे, पर्यवेक्षकीय अधिकारी गटातून डॉ. सुचिता पाटेकर, मधुमती सांगळे,सतीश दर्शनवाड, आनंद सुतार,नामदेव सरदार, अशोकराव महल्ले आदींना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे संशोधन विभाग प्रमुख डॉ. विजय शिंदे, संचालन संगीता क्षीरसागर तर आभार डॉ.राम.सोनारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संशोधन विभाग प्रमुख डॉ विजय शिंदे ,ममता गुर्जर कार्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
बॉक्स

■मिलिंद कुबडे नियमित प्राचार्यपदी■

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मिलिंद कुबडे यांची गत आठवड्यात नियमित प्राचार्य म्हणून पदोन्नती झाली. याच कार्यक्रमादरम्यान जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वतीने प्राचार्य मिलिंद कुबडे यांना शाल व शिवप्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!