spot_img

सातत्य आणि परिश्रमाने यश संपादन करा-हरीश मोरे ,विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रश्न आणि उत्तर संचाचे वाटप

सातत्य आणि परिश्रमाने यश संपादन करा-हरीश मोरे

◆विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रश्न आणि उत्तर संचाचे वाटप
◆ज्ञानराज अकॅडमीमधील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

◆मिररवृत्त
◆नांदगाव पेठ

शैक्षणिक जीवनात वेळेला अधिक महत्व आहे,वेळेचा सदुपयोग करण्यासाठी वेळेचे नियोजन गरजेचे आहे. ध्येयाशिवाय यशाची उंची गाठता येत नाही त्यामुळे चांगले ध्येय ठेवून सातत्य आणि परिश्रमाने यश संपादन करा असे प्रतिपादन कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश मोरे यांनी केले. ज्ञानराज अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी विज्ञान शाखेच्या अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न आणि उत्तर संचाचे वाटप देखील करण्यात आले.
श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्या पुढाकारातून नांदगाव पेठ येथील अकरावी आणि बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना 1996 ते 2023 या काळात संशोधित केलेल्या परीक्षांचे प्रश्नसंच आणि उत्तर संच यांचे मोफत वितरण करण्यात आले.स्थानिक ज्ञानराज अकॅडमी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सभापती हरीश मोरे हे लाभले होते तर प्रमुख अतिथी म्हणून तिवसा विधानसभा अध्यक्ष शैलेश कालबांडे,अभय देशमुख ,सामाजिक कार्यकर्ते राजेश बोडखे ,मुकुंद पांढरीकर,राजन देशमुख,पत्रकार मंगेश तायडे,निंभोरकर काका, चंदू राऊत,किशोर साखरवाडे, दिनकर सुंदरकर यांची उपस्थिती लाभली होती.
पुढे बोलतांना मोरे म्हणाले की,स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना अधिकारी यश संपादन करण्यासाठी हे प्रश्नसंच निश्चितच उपयोगी पडतील. विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांचा संशोधित अभ्यासक्रम या पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिला गेल्याने ऐन परीक्षेचा तोंडावर आपल्याला निश्चितच याचा लाभ होणार आहे.ज्ञानराज अकॅडमी मध्ये उपस्थित अकरावी बारावी च्या सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न आणि उत्तर संचाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी ज्ञानराज अकॅडमी चे संचालिका स्वाती अविनाश लोढे, प्रा. पोटोडे सर,प्रा. ऋषिकेश लहाने
प्रा. अंकिता पोटोडे, मार्गदर्शक प्रा. अविनाश लोढे यांचेसह असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप अकोलकर यांनी केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!