spot_img

ममदापूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या रुग्णसेवेचा आ.ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

ममदापूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या रुग्णसेवेचा आ.ठाकूर यांच्या हस्ते शुभारंभ

■मुलाने अथक प्रयत्नांतून साकारले वडिलांचे स्वप्न.

■मिररवृत्त
■तिवसा

तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या ममदापुर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या रुग्णसेवेचा शुभारंभ काल नुकतांच विभागाच्या आ.यशोमती ठाकूर यांच्या शुभहस्ते वैद्यकीय चमूच्या उपस्थितीत पार पडला.त्यामुळे आता परिसरातील वणी,ममदापूर सुलतानपूर,काटसुर,इसापूर,फत्तेपुर,नमस्कारी आदी गावातील गोरगरीब जनतेला या ठिकाणी आरोग्यसेवेचा लाभ मिळणार आहे.
पूर्वी परीसरात आरोग्याच्या सोईसुविधा उपलब्ध नसल्याने सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मोठा त्रास सहन करत तिवसा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात यावे लागत होते.त्यामुळे आरोग्यसह वेळेची आणि पैश्याची देखील हानी होत होती,परंतु आता ममदापूर येथेच आरोग्याच्या सोईसुविधा मिळणार असल्याने आरोग्याचे प्रश्न तर सुटतीलच सोबतच पैशाची आणि वेळेची सुद्धा मोठ्या प्रमाणत बचत होईल,त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला मोठा दिलासा मिळणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून कडून समाधान व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व्हावे व त्या ठिकाणी परिसरातील गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सोईसुविधा मिळाव्या अशी ईच्छा स्व.बाबारावजी पूनसे हे गावाचे सरपंच असतांना त्यांची होती,त्यामुळे मुलगा मुकुंद पूनसे यांनी गावाची सरपंच पदाची सूत्रे स्वीकारताच वडिलांच्या स्वप्नस्पूर्तीचे ध्येय सामोरे ठेवून त्या दिशेने वाटचाल सुरू केली होती,परंतु गाव मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाने वेढले असल्यामुळे उपकेंद्र साकारन्याचे मोठे आवाहन त्यांच्या समोर होते, त्यामुळे त्यांना हे उपकेंद्र साकारण्या करिता मोठी पराकाष्ठा करावी लागली होती,त्याचीच फलश्रुती म्हणून आज या ठिकाणी सूसज्ज अशी भव्यदिव्य ईमारत साकारण्यात येवून आमदार यशोमतीत ठाकूर यांच्या शुभहस्ते रुग्णसेवेचा शुभारंभ करण्यात आला.
या वेळी तिवसा पंचायत समितीच्या सभापती कल्पना दिवे,उपसभापती रोशनी पूनसे माजी जि.प.समाजकल्याण सभापती दिलीप काळबांडे,तालुका अध्यक्ष सतीश पारधी, प.स.सदस्य शरद वानखडे संचालक रामभाऊ बोकडे,रामहरी लवणकर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ज्योसना पोटपिटे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत इंगळे भाग्यश्री कुकडे,प्रज्ञा तिजारे,हरीश काठाने यासह तत्कालीन सरपंच मुकुंद पूनसे उपसरपंच मितू टेकाडे काटसुरचे पोलीस पाटील शंकर कापसे,गणेश गोरे,सुधीर लवनकर,संदीप थोटे, ग्रा.प.सदस्या वैशाली ठाकरे,रेषमा सांभारे,सदस्य विनोद मसलदी सोमेस्वर इंगोले,ग्रामसेवक प्रेमलता डांबाळे,राधेश्याम महात्मे,योगेश वडे,दिवाकर टेकाडे,निलेश पुनसे महेंद्र इंगोले,भैय्यासाहेब पिंगळे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,तर हा सोहळा यशस्वी करण्या करिता शंकर ढोक संकेत लवनकर,मंगेश पूनसे,राहुल लवनकर,श्रेयस पूनसे,विकी शिरपूरकर,राहुल दाढे,भूषण लाधे,वेदांत बोबडे,सतीश संभरे, पवन दाढे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

■वडिलांची स्वप्नस्पूर्ती झाल्याने मोठ समाधान■

या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व्हावे व त्या ठिकाणी परिसरातील गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सेवा मिळाव्यात अशी इच्छा माझे वडील स्व.बाबारावजी पूनसे हे गावचे सरपंच असतांना त्यांची होती,त्यामुळे त्यांच्या स्वप्ननाची वचनस्पूर्ती व्हावी या करिता मी त्या दिशेने वाटचाल सुरू केली होती हे सर्व करत असतांना मला न्यायालयीन लढ्यासह अनेक संघर्षाला सामोरे जावे लागले,परंतु यामध्ये सर्वात महत्वाचे योगदान ठरले ते जनतेचे माझ्याप्रति असलेले प्रेम,सोबतच या विभागाच्या आ.यशोमती ठाकूर यांची साथ व मार्गदर्शन खऱ्याअर्थाने ताईसाहेबांच्या सहकार्यामुळेच मी माझ्या वडिलांची स्वप्नस्पूर्ती या ठिकाणी करू शकलो,आज बाबा नाही याचं दुःख तर आहे परंतु त्यांची स्वप्नस्पूर्ती झाल्याने मोठ समाधान वाटत.
मुकुंद बा.पूनसे तत्कालीन सरपंच ममदापूर

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!