spot_img

लोकशाही गौरव महासभेत सर्वांनी सहभागी व्हा! युवाआघाडी जिल्हा महासचिव सागर भवते यांचे आवाहन..

लोकशाही गौरव महासभेत सर्वांनी सहभागी व्हा!

■युवाआघाडी जिल्हा महासचिव सागर भवते यांचे आवाहन..

■मिररवृत्त
■तिवसा

सद्यस्थितीत देशात सुरू असलेल्या धार्मिक अराजकतेला पायबंद घालून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना उजागर करण्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांची लोकशाही गौरव महासभा शनिवार दि.20 जानेवारी रोजी सायन्सकोर मैदान अमरावती येथे होणार आहे.तिवसा तालुक्यातील समस्त संविधानप्रेमी जनतेने लोकशाही गौरव महासभेत सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी केले आहे.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेले भारतीय संविधान बदलून मनुवादी व्यवस्था आणण्याचे षडयंत्र आर.एस.एस प्रणित सत्ताधारी केंद्र व राज्य सरकार करीत आहेत.बहुजनांना व वंचितांना संघर्ष करून मिळालेले अधिकार व आरक्षण टिकवून ठेवणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे,कारण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाने सर्व प्रकारची राजेशाही, सरंमजाशाही व्यवस्था नाकारून संसदीय लोककशाहीचा स्विकार केला आहे. आणि ही संसदीय लोकशाही भारतीय संविधानावर आधारित आहे.यातून अप्रत्यक्षपणे जनताच म्हणजे आपणच देशाचा संपुर्ण कारभार करत असतो.म्हणजे जनता हीच देशाची सर्वाधिकारी असते.धर्म, जात, पंथ, भाषा, प्रांत, संस्कृती, रुढी-परंपरा, भौगोलिक वेगळेपण अशा अनेक प्रकारच्या विविधतेने नटलेल्या भारताला एकसंघ ठेवण्याचे काम भारतीय संविधान करते. त्यामुळे आपण ‘प्रथम भारतीय आणि अंतिमही भारतीय आहोत’ आणि ही जाणीव सुस्पष्टपणे सर्वांना झाली पाहिजे या साठी वंचितांनी एकत्र येऊन क्रांतीची मशाल पेटविणे गरजेचे आहे.
शेतकऱयांना हमी भाव मिळावा, बेरोजगारांना कायम नोकरी मिळावी,कंत्राटी व खाजगीकरणा रद्द करावे,युवकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी दराने सुलभ कर्ज मिळालेच पाहिजे,ओबीसी आरक्षण कायम राहून गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचे प्रश्न सामोपचाराने कायदेशीर मार्गाने टिकले पाहिजे,आदिवासी व अल्पसंख्यांक बांधवांचे हक्क व संरक्षण वाढत जाणारे महिला अत्याचार थांबले पाहिजे,विद्यार्थ्यांना वाढीव, नियमित शिष्यवृत्ती आणि त्यांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे अशा अनेक प्रश्नांची उकल होऊन वंचीत बहुजन आघाडीची पुढील राजकीय भूमिका आणि बहुजनांचा सत्तेतला वाटा या विषयी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व अनेक सन्मानीय मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
ही महासभा यशस्वी करणे करिता युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष डॉ.निलेश विश्वकर्मा,अमरावती निरीक्षक डॉ.धैर्यवर्धन फुंडकर जिल्ह्यातील प्रत्येक भागात बैठका घेत असल्याने महासभेकरिता जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.तेव्हा प्रस्थापितांच्या सत्तेच्या खुर्च्या मोडून व मानसिक गुलामगिरी झटकून सत्तेत वाटा मिळविण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा महासचिव सागर भवते यांनी केले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!