spot_img

प्रहारच्या नेतृत्वात वाळूसाठी घरकुल लाभार्थ्यांचा तहसिल कार्यालयावर मोर्चा

प्रहारच्या नेतृत्वात वाळूसाठी घरकुल लाभार्थ्यांचा तहसिल कार्यालयावर मोर्चा

●खडांगा व माती मिश्रित अवैध वाळू विक्री विरोधात नागरिकांचा संताप

●मिररवृत्त
●मंगरुळ दस्तगीर/शरद देवगिरीकर

येथील असंख्य घरकुल लाभार्थी तसेच नागरिकांचा आज तहसिल कार्यालयावर वाळू साठी मोर्चा चालून आला होता ज्यात त्यांनी मंगरूळ दस्तगीर येथील वाळू डेपोमधून होत असलेल्या अवैध वाळू विक्री विरोधात अनेक तक्रारी तहसीलदार गोविंद वाकडे यांच्याकडे मांडल्या.
प. विदर्भातील पहिला वाळू डेपो म्हणुन मोठ्या थाटामाटात काही दिवसा अगोदर उद्घाटन झालेल्या वाळू डेपो विरोधात अनेक तक्रारी समोर येत आहेत. वाळू डेपो संचालक, वाळू वाहतूकदार तसेच जेसीबी चालकांच्या मनमानी कारभाराविरोधात आज मंगरुळ दस्तगीर येथील बहुसंख्य नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षा च्या माध्यमातुन तहसिल कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
वाळू वाहतूकदारां कडून अवैध रित्या वाळू ची विक्री होत असून त्यात वाहतूकदारां कडून खडांगा व माती मिश्रित वाळू ची विक्री केल्या जात असल्याचा पुराव्यानिशी तक्रार नागरिकांकडून करण्यात आली व त्याविषयी संताप त्यांनी व्यक्त केला. तसेच घरकुल लाभार्थ्यांना लवकरात लवकर शासनाकडून देण्यात येणाऱ्या मोफत वाळू चे वाटत करण्यात यावे हि मुख्य मागणी घरकुल लाभार्थ्यांकडून करण्यात आली.
यावेळी प्रहार जिल्हाध्यक्ष प्रविण हेंडवे, तालुकाध्यक्ष सुरज गंथडे, भाजपा शहराध्यक्ष संजय मेने, मिलिंद बनसोड,संतोष तुमसरे, गजानन तांबुसकर, नंदु बुटले, शेख जाकीर, सुरेश भोयर, कांता बमनोटे, उषा पवार, पार्वती पोस्ती, पुष्पा भगत, वंदना शिंदे, शुभांगी भगत, साधना छापेकर, कमल ढेकण, प्रमिला गुल्हाने, साधना लहाबर, प्रगती बुटले, नितिन ताडाम, सुषमा काळे इत्यादींची उपस्थिती होती.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!