spot_img

विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन द्या-पो.नि. प्रवीण काळे; गुरू ग्लोबल स्कुल येथे स्नेहसंमेलन

विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन द्या-पो.नि. प्रवीण काळे

■गुरू ग्लोबल स्कुल येथे स्नेहसंमेलन

■मिररवृत्त
■नांदगाव पेठ

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये कलागुण,खेळाडू वृत्ती देखील महत्वाची आहे.केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता विद्यार्थ्यांमधील कलागुणांना देखील प्रोत्साहन द्यावे असे प्रतिपादन नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे पो.नि. प्रवीण काळे यांनी केले. ते गुरू ग्लोबल स्कुल च्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. स्थानिक संत काशिनाथ बाबा सभागृह याठिकाणी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्नेहसमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ. गोविंद तिरमनवार, आदर्श शिक्षक शरद राऊत, संदीप अकोलकर, पत्रकार मंगेश तायडे, गुरू ग्लोबल स्कुलचे संचालक अशोकराव मानेकर, पुंडलिक मानेकर,आनंद मानेकर,नूतन मानेकर,प्रा.मोरेश्वर इंगळे आदी मान्यवर विचारपिठावर उपस्थित होते.दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.प्रा मोरेश्वर इंगळे यांनी प्रास्ताविक मध्ये शाळेच्या प्रगतीचा आलेख वाचला.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.डॉ. तिरमनवार यांनी म्हटले की,मुलांना जरी आपण इंग्रजी शाळेत प्रवेशित केले तरी त्यांच्यावरील मातृभाषेचे संस्कार कमी पडू देऊ नका.आपल्या पाल्यांसमोर पालकांनी सुद्धा वाचन आणि लिखाण करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून आपले पाल्य देखील आपले अनुकरण करतील.पाल्यांना पर्यावरणाबाबत जागृत करून एक चांगला व्यक्ती घडविण्यासाठी पालकांनी सतत प्रयत्नशील असावे असे देखील प्रा.तिरमनवार म्हणाले.
यावेळी शरद राऊत, संदीप अकोलकर, मंगेश तायडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून गुरू ग्लोबल स्कुल च्या नावीन्यपूर्ण आणि सामाजिक उपक्रमाबाबत प्रशंसा केली. विविध स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते परितोषिक देखील वितरण करण्यात आले. स्नेहसमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.या स्नेहसमेलनाला विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरू ग्लोबल स्कुल च्या शिक्षक वृंद तसेच कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!