डॉ. पं.दे.विधी महाविद्यालय व फाउंडेशन फॉर स्किल डेव्हलपमेंट मुंबई यांच्यात सामंजस्य करार
■मिररवृत्त
■अमरावती
डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय व फाउंडेशन फॉर स्किल डेव्हलपमेंट मुंबई यांच्यामध्ये नुकताच पाच वर्षाकरिता एक सामंजस्य करार करण्यात आला.श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित डॉ.पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात येत असून महाविद्यालयाला नुकताच नॅक द्वारा ए ग्रेड (सी.जी. पी. ए.3.19) प्राप्त झाला आहे.मुंबई येथील फाउंडेशन फॉर स्किल डेव्हलपमेंट यांच्यासोबत सामंजस्य करार करून महाविद्यालयाने विद्यार्थी व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक सुविधांची संधी उपलब्ध करून दिली आहे.
प्राचार्य डॉ.वर्षा देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून फाउंडेशन फॉर स्किल डेव्हलपमेंट चे संचालक सीए आलोक मेहता, मुंबई लायन्स क्लबचे अध्यक्ष सीए हिरेल शहा, जीएसटी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शर्मा व चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष विनोद कलंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख मान्यवरांनी प्राचार्य वर्षा देशमुख यांना लिखित करारनामा सादर केला. या करारामध्ये जीएसटी, इंटरॅक्शन प्रोग्राम, रिसर्च मेथोडोलॉजी, स्किल डेव्हलपमेंट इत्यादी मानव संसाधन व विषय तज्ञांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानस्त्रोत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. लक्ष्मी पवार यांनी तर आभारप्रदर्शन डॉ.प्रणय मालवीय यांनी केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला डॉ प्रणय मालवीय, डॉ. देशपांडे, डॉ .भोगे, डॉ.रामटेके, डॉ.पाटील,डॉ.घुगे,डॉ.लोखंडे, डॉ.इंगोले,डॉ. काळे, प्रा. उदय ठाकरे, प्रा.रसिका वडवेकर,प्रफुल्ल घवळे,रणजित देशमुख,विजय देशमुख,प्रसाद पांडे,प्रवीण गावंडेयांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.