spot_img

बिझिलँड मधील चोरट्यांना ‘हनुमान’ ने पकडले ,गुन्हे शाखेने प्रभात टॉकीज जवळून घेतले तिघांना ताब्यात

बिझिलँड मधील चोरट्यांना ‘हनुमान’ ने पकडले

■गुन्हे शाखेने प्रभात टॉकीज जवळून घेतले तिघांना ताब्यात
■चोवीस तासात चोरीचा उलगडा, रोकड व साहित्य जप्त

■मिररवृत्त
■नांदगाव पेठ

शनिवारी मध्यरात्री बिझिलँड मधील दहा ते बारा दुकाने फोडून रोकड लंपास करणाऱ्या तीन आरोपींना ‘हनुमान’चित्रपट बघत असतांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. अंगझडती घेतांना दोन अँड्रॉइड मोबाईल, एक चायना चाकु आणि ६३५०० रुपयांची रोकड सुद्धा पोलिसांनी हस्तगत केली. तिघेही चोरी केल्यानंतर प्रभात टॉकीज मध्ये ‘हनुमान’ चित्रपट बघायला गेलं होते दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट क्र.१ ने चोवीस तासाच्या आत ही कार्यवाही केली.
मयूर किशोर सोळंके (१८),रोहित चंदुलाल विश्वकर्मा (१९) आणि एक विधिसंघर्ष बालक रा.झेनिथ हॉस्पिटल जवळ, जुना कॉटन मार्केट अमरावती अश्या तीनही आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली.शनिवारी मध्यरात्री बिझिलँड व्यापारी संकुलात अनधिकृतपणे शिरून लोखंडी रॉड च्या माध्यमाने दुकानांची शटर वाकवून तीनही आरोपींनी ६३५०० रुपयांची रोकड लंपास केली होती. तीनही आरोपींचे चेहरे सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने पोलिसांसाठी आरोपी पकडणे कठीण नव्हते मात्र तीनही आरोपी सोमवारी प्रभात टॉकीजला सुरू असलेला हनुमान चित्रपट बघण्यासाठी दु.१२ ला गेले होते. दरम्यान गुन्हे शाखा युनिट क्र.१ ला याबाबत गुप्त माहिती मिळाली आणि तीनही आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपींकडून मुद्देमाल जप्त करून दोघांना कोठडीत रवाना करण्यात आले. खळबळ माजवणाऱ्याया चोरीच्या घटनेतील आरोपी केवळ चोवीस तासात पकडल्याने युनिट क्र.१चे सर्वत्र कौतुक होत आहे.सदर कार्यवाही पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे,यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्र.१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, सपोनि मनीष वाकोडे, पोउनि प्रकाश झोपाटे, राजू आपा, फिरोज खान,सतीश देशमुख,नाईक पोलीस अंमलदार दिनेश नांदे,विकास गुडधे,सुरज चव्हाण,निखिल गेडाम,निवृत्ती काकड,अमोल मनोहर,भूषण पद्मने,किशोर खेंगने यांनी केली.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!