रतन इंडिया मधील कामगारांचा महागाई भत्ता हडपला
■राष्ट्रीय कर्मचारी सेनेची कामगार आयुक्तांकडे तक्रार
■मिररवृत्त
■नांदगाव पेठ
कामगारांचा हक्काचा असलेला महागाई भत्ता रतन इंडिया व्यवस्थापनाने हडप केल्याचा आरोप राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून याबाबत कामगार आयुक्तांना निवेदन देऊन महागाई भत्त्याचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे जिल्हा चिटणीस प्रफुल्ल तायडे यांनी केली आहे.
रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांना जुलै२०२३ मध्ये महागाई भत्ता मंजूर झाला होता मात्र व्यवस्थापनाने अद्यापही कामगारांना महागाई भत्ता दिलेला नाही. याबाबत व्यवस्थापनाला विचारणा केली असता निव्वळ उडवाउडवीची उत्तरे देऊन कामगारांची बोळवण करण्यात येत आहे. कामगारांचा हक्काचा महागाई भत्ता रतन इंडिया व्यवस्थापनाने हडप केला अशी तक्रार राष्ट्रीय कर्मचारी सेनेने कामगार आयुक्तांकडे केली असून याप्रकरणी त्वरित कार्यवाही करून कामगारांचा महागाई भत्ता अद्याप का देण्यात आला नाही याचा जाब कामगारांना देण्यात यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी निवेदन देतांना प्रफुल्ल तायडे,राज्य चिटणीस वेदांत तालन, राज्य सहचिटणीस महेंद्र गाडे,दीपक यावले,अजय खंडारे, सुनील खंडारे, विनोद पांडे,रोशन भीमकर,प्रवीण खंडारे,भोजराज ठाकूर यांचे सह अनेक कर्मचारी हजर होते.