spot_img

१५ जानेवारी पासून संत काशीनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ, दर्शनासाठी भाविकांची लागणार रीघ

१५ जानेवारी पासून संत काशीनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ

■दर्शनासाठी भाविकांची लागणार रीघ
■संगीतमय भागवत कथेचे आयोजन

■मिररवृत्त
■नांदगाव पेठ

परमहंस श्री.संत काशीनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला १५ जानेवारी पासून प्रारंभ होत आहे. विदर्भासह राज्यात असलेल्या भाविक भक्तांची या महोत्सवादरम्यान दर्शनासाठी रीघ लागणार असून हजारो भाविक या पुण्यतिथी महोत्सवात सामील होणार आहे.सप्ताहामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.दररोज हभप केशवदादा उखळीकर महाराज यांच्या यांच्या सुमधुर वाणीतील संगीतमय भागवत कथेचे भाविकांसाठी आयोजन करण्यात आले आहे.स्थानिक काशिनाथ धाम, नाफडे पेट्रोलपंप जवळील जागेत हा पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे.
पुण्यतिथी महोत्सवाचे हे १८ वे वर्ष आहे. संत काशीनाथ महाराज यांचा भक्तगण संपूर्ण राज्यात असुन दरवर्षी पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने संतनगरी नांदगाव पेठ येथे भाविकांची मंदियाळी असते. येथे असलेल्या काशिनाथ महाराज यांच्या भव्य मंदिरावर रोषणाई करण्यात आली असून संपूर्ण परिसर भक्तिमय झालेला आहे.दररोज सकाळी साडे पाच वाजता काकड आरती होणार आहे..सकाळी ७ ते ९ आरती व संत काशिनाथ बाबा यांची प्रार्थना होईल.दररोज सकाळी ९ ते १२ व ३ ते ६ दरम्यान हभप केशवदादा उखळीकर महाराज यांच्या यांच्या सुमधुर वाणीतील संगीतमय भागवत कथेचे भाविकांसाठी आयोजन करण्यात आले आहे.सायंकाळी हरिपाठ आणि सामुदायिक प्रार्थना होणार आहे.
१५ जानेवारी ते २१ जानेवारी दररोज रात्री साडे आठ वाजता हभप श्री.श्याम नारायणदास महाराज चौबे(आळंदीकर),हभप श्री.संतोष महाराज निंबाळकर(आळंदीकर),हभप श्री.कबीर महाराज अत्तार (पुणे),हभप श्री.बाळू महाराज गिरगावकर(जिंतूर),हभप श्री.वैभव महाराज तराळ(सामदापूर),हभप श्री.संजय महाराज पाचपोर (अकोला),हभप श्री.रमेश महाराज दुधे(पाळोदी) यांचे नियोजित हरिकर्तन होणार आहे.२२ जानेवारी रोजी पुण्यतिथी महोत्सवाची सांगता असून दुपारी १२ ते ५ दरम्यान महाप्रसाद वितरित करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संत काशिनाथ महाराज संस्थान च्या वतीने करण्यात आले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!