spot_img

प्रेस्टिज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.राजेंद्र नरगुंडकर ह्यांची प्रो.राम मेघे इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी अँड रिचर्स बडनेरा येथे सदिच्छा भेट

प्रेस्टिज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.राजेंद्र नरगुंडकर ह्यांची प्रो.राम मेघे इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी अँड रिचर्स बडनेरा येथे सदिच्छा भेट

■मिररवृत्त
■अमरावती

विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी संचलित प्रो.राम मेघे इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी अँड रिचर्स बडनेरा प्रेस्टिज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.राजेंद्र नरगुंडकर यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.नितीन धांडे,उपाध्यक्ष अॅड. उदय देशमुख,कोषाध्यक्ष प्रा.डॉ. हेमंत देशमुख,अश्विनी मॅडम,पीआर एमआयटीआर चे प्राचार्य डॉ. गजेंद्र बामनोटे,प्रा.राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनीअरींग अँड मॅनेजमेंट बडनेरा चे प्राचार्य डॉ.दिनेश हरकुट,इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.सचिन दिघडे उपस्थित होते,
यावेळी संस्थेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी संचलित महाविद्यालयांच्या कार्याचे कौतुक व अभिनंदन केले.नवीन शैक्षणिक धोरण हे देशासाठी व येणाऱ्या पिढीसाठी उपयुक्त ठरेल असे मत व्यक्त केले,
संस्थेचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. संस्थेत विधार्थी केंद्रित व संस्थेच्या प्राध्यापक व कर्मचारी यांचा संस्थेच्या यशात मोठा वाटा आल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या काही विभागांना भेटी दिल्या. कार्यक्रमाचे संचालन डॉ.निकु खालसा व आभार प्रदर्शन डॉ. हर्षद देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला विभाग प्रमुख, प्राध्यापकवृंद उपस्थित होते

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!