spot_img

बाळशास्त्री जांभेकरांच्या पुतळ्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच अनावरण,अनिल अग्रवाल यांची घोषणा

बाळशास्त्री जांभेकरांच्या पुतळ्याचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच अनावरण

■अनिल अग्रवाल यांची घोषणा

■यावर्षीपासून दिला जाणार स्व. दादासाहेब काळमेघ पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार

■जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात

■मिररवृत्त
■अमरावती
महाराष्ट्रातील सर्वच मराठी पत्रकारांचे आद्य असणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या राज्यातील पहिल्या पुतळ्याची निर्मितीची संकल्पना पुढे ठेवून अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाने नवे पाऊल उचलले आहे. सदर पुतळा निर्मितीचे काम सुरू असून लवकरच या पुतळ्याचे अनावरण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाईल अशी घोषणा अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी केली आहे.
वालकट कंपाऊंड परिसरातील मराठी पत्रकार भवन येथे आज अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिन तथा पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, भारतीय जनसंचार संस्थानचे अमरावती केंद्रिय संचालक राजेश कुशवाह, सकाळ वृत्तसमूहाचे संपादक राहुल गडपाले, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संजय शेंडे, सरचिटणीस प्रफुल्ल घवळे, सुधीर भारती यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना अनिल अग्रवाल यांनी सांगितले की आजच्या काळात सर्वच पत्रकारांनी स्वतःला अपडेट करणे गरजेचे झाले आहे. येणारे दिवस हे अत्यंत घातक असण्याची शक्यता असून त्यासाठी आपले ज्ञान आणि तंत्रज्ञान दोन्हींचा संगम होणे आवश्यक आहे. नवोदित पत्रकारांनी सर्व जग हातात आहे असे न समजता दररोज वाचनाची सवय लावून घ्यावी असा मोलाचा सल्ला देखील दिला.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना हेमंत काळमेघ यांनी डॉ.पंजाबराव देशमुख यांनी सुरू केलेल्या नियतकालकाचा उल्लेख करत पत्रकारिता क्षेत्रातील ऐतीहासिक बाबी उलगडून सांगितल्या. सोबतच राहुल गडपाले आणि कुशवाह यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात आपण स्वताला बदलणे गरजेचे असून नवे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक झाल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस प्रफुल्ल घवळे यांनी, सूत्रसंचालन प्रसिद्धी प्रमुख गौरव इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन सरचिटणीस सुधीर भारती यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक पत्रकार, छायचित्रकार, इलेक्ट्रॉनिक्स मिडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

■अशोक जोशी यांना जीवन गौरव पुरस्कार■
अमरावती शहरात ३० वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सेवा देणारे अशोक जोशी यांचा अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्प असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सोबतच जनसंपर्क क्षेत्रात कार्य करणारे डॉ.विलास नांदुरकर, भूषण पुसदकर, फुलसिंग राठोड, अनिल मानकर, मंगला देशमुख यांचा देखील सन्मान अतिथिंच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि पुष देऊन करण्यात आला.

बाब■चाटजीपिटिवर लवकरच घेणार कार्यशाळा■

जग दिवसेंदिवस बदलत चालले असून येणाऱ्या काळात स्वतःला स्पर्धेत टिकविण्यासाठी आपल्याला नवे तंत्रज्ञान अवगत होणे गरजेचे आहे. आज एआय आणि चाट जीपीटी च्या वापरातून अनेक बाबी सहज होत आहेत. ते समजून घेतल्यास आपले काम अधिक वेगाने करू शकतो. त्यामुळे हे तंत्रज्ञान पत्रकारांना समजून घेता यावे यासाठी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने या विषयावर लवकरच कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल असे अनिल अग्रवाल यांनी यावेळी सांगितले

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!