spot_img

आठ राज्यांच्या स्क्रीनिंग समितीच्या सदस्यपदी ॲड.यशोमती ठाकूर

आठ राज्यांच्या स्क्रीनिंग समितीच्या सदस्यपदी ॲड.यशोमती ठाकूर

■मिररवृत्त
■अमरावती

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या वतीने विविध राज्यांसाठी नेमण्यात आलेल्या स्क्रीनिंग समितीमध्ये ॲड. यशोमती ठाकूर यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील केवळ दोन नेत्याचा स्क्रीनिंग समितीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हा आपल्या कामाचा गौरव आणि महिलांच्या कर्तृत्वाला वाव देणारी असल्याची प्रतिक्रिया ॲड.यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसच्या वतीने क्लस्टर निहाय अध्यक्ष आणि दोन सदस्यांची स्क्रीनिंग समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार देशभरातील सर्व राज्यांसाठी पाच क्लस्टर समित्या नेमण्यात आल्या आहेत. त्यानुसार हरीश चौधरी, मधुसूदन मिस्त्री, रजनी ताई पाटील, भक्त चरणदास आणि राणा केपी सिंग यांच्या अध्यक्षतेखाली या समित्या काम करणार आहेत.

■रजनी ताई पाटील यांच्याकडे राजस्थानची जबाबदारी■

राज्यसभेतील खासदार रजनीताई पाटील यांच्याकडे राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, दिल्ली आणि दादरा नगर हवेली या राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्या या क्लस्टर समितीच्या अध्यक्षा म्हणून काम पाहणार आहेत. तर काँग्रेसच्या आमदार आणि माजी मंत्री अँड. यशोमती ठाकूर यांची उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब ,चंदिगड ,जम्मू काश्मीर आणि लडाख या राज्यांच्या स्क्रीनिंग समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत नीरज डांगी हे सहसदस्य असतील तर भक्तचरण दास हे अध्यक्ष असणार आहेत. पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी ही यादी प्रसिद्ध केली असून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या सर्व समित्यांची नियुक्ती केली आहे.

■हा तर माझ्या कामाचा गौरव– ॲड. ठाकूर■
दरम्यान या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना एडवोकेट यशोमती ठाकूर म्हणाल्या की, गेल्या अनेक वर्षांपासून आपण सामाजिक आणि राजकीय जीवनात सातत्याने काम करीत आहोत. महिला, शेतकरी आणि कष्टकरी वर्गासाठी आपण सातत्याने केलेल्या कामाचे हे फळ आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या स्क्रीनिंग समित्यांमध्ये महाराष्ट्रातील दोन महिलांचा समावेश होतो ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि महिलांच्या कर्तुत्वाला वाव देणारी बाब आहे. माझ्यावर पक्षाने दाखवलेला विश्वास आणि सोपवलेल्या जबाबदारीला मी माझ्या कामातून निश्चितच न्याय देण्याचा प्रयत्न करीन, असेही ॲड. ठाकूर यावेळी म्हणाल्या.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!