spot_img

डिजिटल तंत्रज्ञानाने पत्रकारितेचा फॉरमॅट बदलविला: संपादक सरिता कौशिक,आयआयएमसीत मराठी पत्रकारिता दिनानिमित्त संपादक संवाद

डिजिटल तंत्रज्ञानाने पत्रकारितेचा फॉरमॅट बदलविला: संपादक सरिता कौशिक

■आयआयएमसीत मराठी पत्रकारिता दिनानिमित्त संपादक संवाद

■मिररवृत्त
■अमरावती

डिजिटल माध्यमांनी पत्रकारितेचे अंतरंग बदलविले आहे. तंत्रज्ञानाच्या आगमनाने बातमी प्रसारणाचे स्वरूप गतिमान झाले मात्र पत्रकारितेचे मूळ मूल्य बदलले नाही. काल पत्रकारिता ज्या हेतूने आणि ध्येयाने केली जात होती ती आजही त्यानुसारच केली जात आहे फक्त पत्रकारितेचा फॉरमॅट बदलला आहे तो डिजिटल झाला आहे असे मत एबीपी माझा वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी व्यक्त केले. ते आयआयएमसीत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

भारतीय जन संचार संस्थान (आयआयएमसी) पश्चिम क्षेत्रीय परिसरात मराठी पत्रकारिता दिनानिमित्त संपादक संवाद अंतर्गत “डिजिटल युगातील मराठी पत्रकारिता” या विषयावर दिनांक ६ जानेवारी रोजी विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सरिता कौशिक यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या प्रसंगी संस्थानचे क्षेत्रीय संचालक डॉ. राजेश सिंह कुशवाहा, डॉ विनोद निताळे, डॉ आशिष दुबे उपस्थित होते.पुढे बोलताना सरिता कौशिक म्हणाले, मराठी पत्रकारिता या नव माध्यमांमुळे पूर्वी पेक्षा अधिक गतिमान झाली आहे. स्मार्ट फोन मुळे आज बातमी लोकांच्या खिशात पोहचली आहे. डिजिटल पत्रकारितेमुळे क्षणार्धात कोणतीही घटना आता लोकांपर्यंत पोहचविणे शक्य झाले आहे. डिजिटल माध्यमांनी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. माध्यमात केवळ नौकरी करण्यासाठी नाही तर या क्षेत्रात उदयोजक म्हणून करियर करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाने संधी उपलब्ध करून दिली आहे. या नवं माध्यमाचा वापर केवळ मनोरंजनासाठी करू नका तर रोजगाराचे आणि व्यवसायाचे नवीन साधन म्हणून विद्यार्थांनी या कडे बघावे असा सल्ला देखील त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सरिता कौशिक यांच्याशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. याप्रसंगी मराठी पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ‘लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी’ हे गीत सादर केले. यावेळी प्रायोगिक वृत्तपत्राचे देखील प्रकाशन करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात डॉ राजेश कुशवाहा यांनी डिजिटल माध्यमांची भाषा शैली यावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डॉ विनोद निताळे यांनी तर पाहुण्यांचा परिचय डॉ आशिष दुबे यांनी करून दिला.याप्रसंगी मराठी, हिंदी आणि इंग्रजी पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!