spot_img

पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारावर हल्ला, जीवे मारण्याची धमकी ,आरोपीला अटक,पत्रकार संघटनांकडून निषेध

पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारावर हल्ला, जीवे मारण्याची धमकी
■आरोपीला अटक,पत्रकार संघटनांकडून निषेध

■वृत्तसंकलनावेळी वराहांचे छायाचित्रण केले म्हणून घातला वाद

■मिररवृत्त
■अमरावती

पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येलाच अमरावतीत एका खासगी वृत्तवाहिनीच्या ३४ वर्षीय पत्रकारावर हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि. ५) दुपारी जिल्हा स्त्री रुग्णालय ( डफरीन) येथे घडली. या प्रकरणात हल्लेखोराविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करून पोलिसांनी सायंकाळी मुख्य हल्लेखोराला पकडले आहे. सिद्धू ऊर्फ सिद्धांत रंगराज पळसपगार (२५, रा. योगायोग कॉलनी, चपराशी पुरा) असे पत्रकारावर हल्ला करणाऱ्याचे नाव आहे. अमर घटारे (३४, रा. अर्जुननगर) असे मारहाण झालेल्या खासगी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी डफरीनमध्ये अमर घटारे वृत्त संकलनासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत एका अन्य वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी व कॅमेरामन देखील होते. अमर घटारे यांनी कॅमेऱ्यात शूटिंग सुरू केली असताना तेथे एक व्यक्ती त्यांच्याजवळ आला. त्याने येथील वराहांची शूटिंग तू का घेतली, अशी विचारणा केली. त्यानंतर त्याने घटारेंना शिवीगाळ केली. शिवीगाळ करण्यासोबतच त्याने घटारे यांना मारहाण केली. यानंतर हल्लेखोरांनी डफरीनचे
कार्यालय प्रमुख डॉ. विनोद पवार व त्यांचे सुरक्षा रक्षक वसंत हुमने यांना देखील धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याचे अमर घटारे यांनी गाडगेनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
हल्लेखोरांनी अमर घटारे यांच्याजवळील मोबाइल हिसकावून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. घटनेनंतर अमर घटारे सहकाऱ्यांसह तात्काळ गाडगेनगर पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी या प्रकरणाची तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी हल्लेखोरांविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना हल्लेखोराला अटक करण्याच्या सूचना दिल्यात. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे पीआय आसाराम चोरमले, गाडगेनगरचे ठाणेदार गजानन गुल्हाने यांनी तत्काळ आरोपीचा शोध सुरू केला व शुक्रवारी सायंकाळी हल्लेखोराला पकडले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येत पत्रकार गाडगेनगर पोलिस ठाण्यात पोहोचले. पत्रकार संघटनांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!