spot_img

प्रा.राम मेघे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा येथे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची राज्य व राष्ट्रीय शिबिरा करिता निवड

प्रा.राम मेघे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा येथे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची राज्य व राष्ट्रीय शिबिरा करिता निवड

■मिररवृत्त
■अमरावती

प्रा.राम मेघे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या तेजस्विनी खाडे व सुरज मुंढे या स्वयंसेवकाची २५ डिसेंबर ते ०३ जानेवारी दरम्यान गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आव्हान-२०२३-२४ आपत्ती व्यवस्थापन शिबिराकरिता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संघात निवड करण्यात आली होती.तसेच प्राप्ती उगले या स्वयंसेविकेची राष्ट्रीय एकता शिबीर स्वामी आत्मानंद शासकीय इंग्रजी माध्यम आदर्श महाविद्यालय सोमाणी,दुर्ग छत्तीसगड येथे दि २ जानेवारी ते ८ जानेवारी २०२४ या कालावधी मध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रीय शिबिरा करिता निवड झालेली आहे. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.जी.हरकुट यांनी स्वयं सेवकांचे कौतुक केले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.शुभम कदम,प्रा.गायत्री बहिरे,प्रा.आशिष सायवान,प्रा.प्रवीण बोलके, प्रा.विजय खंडार व अंकुर मोहोड उपस्थित होते.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.नितीन धांडे,उपाध्यक्ष ॲड.उदय देशमुख,कोषाध्यक्ष प्रा.हेमंत देशमुख, सचिव युवराजसिग चौधरी, सन्माननिय सदस्य शंकरराव काळे, नितीन हिवसे, रागिनी देशमुख, डॉ. वैशाली धांडे, डॉ. पुनम चौधरी यांनी कौतुक केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!