spot_img

नवलाजी बाबा विद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख जयंती साजरी

नवलाजी बाबा विद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख जयंती साजरी

■मिररवृत्त
■नांदगाव पेठ

शिक्षण महर्षी तथा कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या१२५ व्या जयंत्युत्सवानिमित्य मंगरूळ भिलापूर येथील नवलाजी बाबा विद्यालयात स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.विद्यालयात डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ऍड.जयवंत उपाख्य भैय्यासाहेब पाटील हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.सुभाष बनसोड, मुख्याध्यापिका व्ही. बी. राऊत,शाळा समिती सदस्य विनायक वानखडे, डॉ. मोहन देशमुख, सरपंच जयश्री वानखडे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
पाच दिवस विविध सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रम याठिकाणी आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ऍड. जयवंत देशमुख यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.स्नेहसमेलनामध्ये वक्तृत्व स्पर्धा, प्रश्न मंजुषा, गितगायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला, पाककला आदींचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
स्नेहसमेलनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. कार्यक्रमाला मंगरूळ,शिरजगाव, भिलापूर,नांदुरा व घोडगव्हाण येथील मान्यवर मंडळी उपस्थित होती. पाच दिवसीय कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी यांचे अथक परिश्रम लाभले. सूत्रसंचालन एस एन इंगोले यांनी केले तर आभार जुनघरे यांनी मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!