spot_img

गुरू ग्लोबल स्कुल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

गुरू ग्लोबल स्कुल मध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

■मिररवृत्त
■नांदगाव पेठ

येथील गुरू ग्लोबल स्कुल मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.विद्यार्थ्यांनी यावेळी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधून धरले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचेपूजन व हारार्पण करून विद्यार्थ्यांना शाळेच्या उपक्रमाबाबत तसेच सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबाबत माहिती देण्यात आली.यावेळी पवित्रा पोटफोडे तसेच राजवी इंगळे या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून सावित्रीबाई यांच्या जीवनकार्याची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.
गुरू ग्लोबल स्कुल मध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात तसेच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी शाळेचे नेहमी प्रयत्न असतात. या कार्यक्रमाला पालकांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीगुरू ग्लोबल स्कुल च्या शिक्षिका अश्विनी मानेकर , भाग्यश्री भगत , अंकिता पडोळे , अंजली खेकरे तसेच देशमुख मॅडम व शंकर देहाडे उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!