spot_img

संविधान वाचविण्यासाठी आता शौर्य दाखविण्याची वेळ ,मानवंदना कार्यक्रमात आनंदराज आबेडकर गरजले

संविधान वाचविण्यासाठी आता शौर्य दाखविण्याची वेळ

■मानवंदना कार्यक्रमात आनंदराज आबेडकर गरजले

■मिररवृत्त

■अमरावती

आपल्या शक्तीचे आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या भीमा कोरेगाव विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी आपण सर्व एकत्र आलोय या अर्थाने आपला इतिहास आपण जिवंत ठेवला आहे. आपल्या पूर्वजांच्या बुद्धी आणि शक्तीचे आपण वंशज आहोत हे वेगळे सांगायची गरज नाही मात्र आता इतिहास पुनर्जीवित करावा लागणार आहे,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वसामान्य नागरिकांना संविधानाच्या माध्यमातून दिलेले हक्क आणि अधिकार हिरावून घेण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे, संविधानात छेडछाड करून संविधान बद्दलविण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू आहेत त्यामुळे आता संविधान वाचविण्यासाठी आपले शौर्य दाखविण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आबेडकर यांनी केले. सायन्सकोर मैदान येथे तीन दिवसीय मानवंदना कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ते गरजले.
लॉर्ड बुद्धा त्रिवार वंदन संघ, भीमा कोरेगाव विजयस्तंभ मानवंदना आयोजन समिती यांच्या वतीने १ ते ३जानेवारी दरम्यान सायन्सकोर मैदान येथे शौर्य दिनानिमित्य मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.२ जानेवारी रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. दिलीप एडतकर होते. लढ्यातील शूरवीर सिद्धनाक महार यांचे बारावे वंशज मिलींद इनामदार विशेष तर प्रमुख अतिथी म्हणून तेरावे वंशज अभिजीत इनामदार, माजी आय.आर.एस अधिकारी सुभचन राम, लंडन येथील एम. एस. बहल, रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष विनायक दुधे, जिल्हाध्यक्ष अनिल बरडे, समाधान वानखडे, इशाद मुजावर, शिवा प्रधान, राजेंद्र नितनवरे, अवधूत मकेश्वर, डॉ गोविंद कासट, बन्सी भटकर, किशोर सरदार, रफिक शेठ, बी. आर. धाकडे, अनिल बागडे, मंदाकिनी बागडे, सतीश नाईक, राहुल मेश्राम, देवेंद्र खांडेकर, रवी नागले, धनंजय गुडदेकर, राजेंद्र नितनवरे, सतीश नाईक यांच्यासह अन्य मान्यवर धम्मपिठावर विराजमान होते.
जिल्ह्यातील बुद्ध विहार समिती, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्त्यांचा यावेळी उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सिद्धनाक महार यांचे बारावे वंशज मिलिंद इनामदार यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, आपला समाज हा शूरवीरांची वंशज आहे,अन्याय अत्याचाराला बळी पडणारा आपला समाज नाही त्यामुळे समाजावर जर अन्याय झालाच तर याविरोधात एकत्र येऊन लढा द्या, कैलाश मोरे यांनी विजयस्तंभ मानवंदना निमित्याने अमरावती करांना चांगला पायंडा घालून दिला आहे त्यामुळे वर्षानुवर्षे हा इतिहास आपल्या डोळ्यासमोर प्रेरणा देणारा ठरणार असल्याचे मत सुद्धा इनामदार यांनी व्यक्त केले.
या मानवंदना कार्यक्रमाला असंख्य भीमसागर लोटला होता. कैलाश मोरे यांनी अविरत बारा वर्षांपासून राबविलेल्या या यशस्वी आयोजनाचे अनेकांनी कौतुक केले. उद्धाटन कार्यक्रमानंतर भीम बुद्ध गीतांचा नॉनस्टॉप कार्यक्रम अयोजिय करण्यात आला होता यावेळी नागरिकांची गर्दी जमली होती.

■मतांचे मूल्य जपा- दिलीप एडतकर■

संविधानाच्या तरतुदीला धक्का न लावता हक्क हिरावून घेतले जात आहे.जात चोरून लोक निवडणूक लढवीत आहेत. ५०० शूरवीर महारांनी शौर्य गाजवले, त्यांचे वंशज म्हणून आपण आपल्या मतांच्या मूल्यांचा आदर राखला पाहिजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची खऱ्या अर्थाने आपण अवलाद असाल तर आपल्या मताचे मूल्य जपा असे प्रतिपादन दैनिक विदर्भ मतदारचे संपादक अॅड. दिलीप एडतकर यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!