spot_img

सावित्रीबाई फुले आदर्श पालक पुरस्काराने दिलीपराव दुर्गे सन्मानित ,स्व. दत्तात्रय पुसदकर महाविद्यालयाचा उपक्रम

सावित्रीबाई फुले आदर्श पालक पुरस्काराने दिलीपराव दुर्गे सन्मानित

■स्व. दत्तात्रय पुसदकर महाविद्यालयाचा उपक्रम

■स्त्री शिक्षणाला चालना देणाऱ्या पालकांना पुरस्कार

■मिररवृत्त
■नांदगाव पेठ

येथील स्व. दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालयाच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी सावित्रीबाई फुले आदर्श पालक पुरस्कार- २०२४ ,अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलींना उच्च शिक्षण देणारे माऊली जहागीर येथील श्री दिलीपराव दुर्गे यांना प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण समारंभाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय दरणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री वल्लभ फाउंडेशन आणि मधुरम स्कूलचे व्यवस्थापकीय संचालक श्रीमती डॉ.कुंजन वेद यांच्यासह सौ.रंजना दुर्गे उपस्थित होत्या.
मुलगा – मुलगी असा कोणताही भेद न करता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलींना उच्च शिक्षण देण्यासाठी धडपड करणाऱ्या पालकांना दरवर्षी महाविद्यालयाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या नावाने आदर्श पालक पुरस्कार, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी देण्यात येतो.३००१ रुपयांचा धनादेश, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २०१४ पासून सदर पुरस्कार महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी स्त्री शिक्षणाला चालना देणाऱ्या पालकांना देण्यात येतो. यावर्षीच्या पुरस्कार वितरण समारंभाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरस्कार वितरण समितीचे समन्वयक डॉ. गोविंद तिरमनवार यांनी पुरस्कार वितरणामागची भूमिका प्रास्ताविकातून विशद केली. त्यानंतर श्री दिलीपराव दुर्गे यांना पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.कुंदन वेद यांनी आपल्या भाषणातून महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतिक करीत महाविद्यालयातील मुलींनी कोणत्याही परिस्थितीत न डगमगता खंबीरपणे सर्व जबाबदाऱ्या पार पाडीत पुढे जावे आणि स्त्री ही अबला नसून ती सक्षम आहे हे आपल्या कार्यातून सिद्ध करावे असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय दरणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयाच्या वतीने मुलींच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. सुभाष पवार यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.पी.आर. जाधव ,प्रा. राजेश ब्राह्मणे, डॉ. श्रीकांत माहुलकर, डॉ.सुनिता बाळापुरे, डॉ. विकास अडलोक,डॉ. पंकज मोरे, श्री. ज्ञानेश्वर बारस्कर, रेखा पुसतकर, विनायक पावडे, दिलीप पारवे, अनिल शेवतकर ,राहुल पांडे आणि महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!