spot_img

भंडाऱ्यातील सनफ्लॅग कंपनीत स्फोट:3 कामगार भाजले

भंडाऱ्यातील सनफ्लॅग कंपनीत स्फोट:3 कामगार भाजले

■मंगळवारी पहाटे घडली घटना

■मिररवृत्त
■भंडारा

भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील वरठी येथे असलेल्या सनफ्लॅग आयर्न अन्ड स्टील कंपनीत मंगळवारी पहाटे स्फोट झाला. या स्फोटात तीन कामगार जखमी झालेत. जखमी श्रमिकांना उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात तत्काळ हलविण्यात आले.घटनेच्यावेळी कंपनीत काम करणाऱ्या आणखी आठ कामगारांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. कंपनीतील एसएमएस या विभागातील एलएचएफ यूनिटमध्ये ही घटना घडली. घटनेचे मूळ कारण अद्याप अस्पष्ट आहे. हिटिंग फरनेसमध्ये अचानक मोठा स्फोट झाल्याने तारांबळ उडाल्याचे श्रमिकांनी सांगितले.
भागात कार्यरत तीन श्रमिक यात भाजले आहेत. तंत्रज्ज्ञ नामदेव झंझाड, अभियंता सागर गभने व कंत्राटी कामगार
हटवार यांचा जखमीत समावेश आहे. त्यांना नागपूर येथे
हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली.स्फोट एवढा भयानक होता
की, कंपनीतील जवळपास असलेला परिसर हादरला. या
अपघातात कंपनीतील साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.

■सुदैवाने प्राणहानी झाली नाही■

ऐन हिवाळी अधिवेशना दरम्यान बाजारगाव येथील सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटात नऊ कामगार ठार झाले होते. या कामगारांचे मृतदेहसुद्धा अंत्यसंस्कारासाठी मिळू शकले नव्हते. इतक्या त्यांच्या मृतदेहाच्या चिंधड्या उडाल्या होत्या. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली होती. कंपनीमधील कामगार सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!