spot_img

प्रफुल तायडे यांची राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती

प्रफुल तायडे यांची राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती

■मिररवृत्त
■नांदगाव पेठ

जिल्ह्यातील धडाडीचे कामगार नेतृत्व अशी ओळख निर्माण करणारे कामगार नेते तथा सर्वसामान्य कामगारांसाठी झटणारे प्रफुल्ल तायडे यांची शिवसेना राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या अमरावती जिल्हा चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये कामगार नेते किरण पावसकर तसेच राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे प्रदेश चिटणीस वेदांत तालन यांनी तायडे यांना ही महत्वपूर्ण जबाबदारी दिली.
प्रफुल्ल तायडे यांनी कामगार संघटनेच्या माध्यमातून आजवर अनेक कामगारांचे प्रश्न सोडवले. कामगारांवर जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा तायडे यांनी कामगारांची बाजू घेऊन प्रशासनाला धारेवर धरले. प्रकल्पग्रस्त कामगारांसाठी प्रफुल तायडे यांनी उभारलेला लढा सर्वश्रुत आहे शिवाय कामगारांना न्याय मिळवून देण्यात सुद्धा तायडे यांची महत्वाची भूमिका आहे.
त्यांच्या कार्याची दखल घेत शिवसेना राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या अमरावती जिल्हा चिटणीसपदी प्रफुल तायडे यांना नव्याने जबाबदारी देण्यात आली. नियुक्ती पत्र देतांना प्रदेश चिटणीस वेदांत ताल्हन,शिवसेना जिल्हा प्रमुख अरुण पडोळे,जिल्हा प्रमुख गोपाल अरबट, महानगर प्रमुख संतोष बद्रे,सहचिटणीस महेंद्र गाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रफुल तायडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!