spot_img

हिम्मत असेल तर आमदार अपात्रतेचा निर्णय घ्या -ॲड. यशोमती ठाकूर यांचे सरकारला आव्हान

हिम्मत असेल तर आमदार अपात्रतेचा निर्णय घ्या –

■ॲड. यशोमती ठाकूर यांचे सरकारला आव्हान

■मिररवृत्त
■मुंबई

आमदार अपात्रता प्रकरणांमध्ये विद्यमान सरकार कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे धास्तावलेल्या सरकारने काँग्रेसला बदनाम करण्याचा डाव सुरू केला आहे. काँग्रेस फुटेल अशा कंड्या काही लोकांना हाताशी धरून पिकवल्या जात आहेत. मात्र जर सरकारची हिंमत असेल तर त्यांनी आमदार अपात्रता याचिकेवरचा निर्णय घेऊन दाखवावा, असे आव्हान काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सरकारला दिले आहे.

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर आहे लवकरच काँग्रेस मधील एक मोठा गट फुटून बाहेर पडेल अशा कंड्या पिकवल्या जात आहेत. समाज माध्यमांवरील काही इन्फ्ल्यून्सर्सना हाताशी धरून अशा पद्धतीची वातावरण निर्मिती केली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे हे महायुतीच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच महायुती मधील घटक पक्षांचे धाबे दणाणले आहे. आतापर्यंत विविध खाजगी सर्वेक्षण संस्थांनी आगामी निवडणुकांबाबत केलेले अंदाज पाहता महायुतीची राज्यात पीछेहाट होताना दिसत आहे. त्यामुळे विरोधकांचे नैतिक खच्चीकरण करण्यासाठी अशा पद्धतीच्या कंड्या पिकवल्या जात आहेत वास्तविक निवडून येण्याची शक्यता आणि क्षमता असताना आपला पक्ष सोडून कोण जाईल हा साधा विचार सुद्धा अफवा पसरवणाऱ्यांच्या मनात येत नाही , अशी प्रतिक्रिया ॲड. ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांच्या अपात्रतेबाबतचा जर निर्णय झाला तर महायुती सरकारच कोसळणार, याबाबत आता जनतेची ही खात्री झाली आहे. त्यामुळेच आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय लांबवला जात आहे. जर सरकारची हिम्मत असेल आणि विधानसभा अध्यक्षांची सदसदविवेक बुद्धी जागी असेल तर त्यांनी आमदार अपात्रतेच्या याचीकेवरचा निर्णय घेऊन दाखवावा, कशासाठी आता वेळ काढताय? असा सवाल करीत आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी सरकारला आव्हान दिले आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!