spot_img

मातोश्री सरस्वती वाठ माध्यमिक विद्यालय दाभा येथे रजत महोत्सव

मातोश्री सरस्वती वाठ माध्यमिक विद्यालय दाभा येथे रजत महोत्सव

■विविध कार्यक्रमांचे आयोजन

■मिररवृत्त
■टिमटाळा (श्रीपाल सहारे)

मातोश्री बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था अमरावती द्वारा संचालित मातोश्री सरस्वती माध्यमिक विद्यालय दाभा येथे रजत महोत्सव वर्षानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून दाभा येथील माजी सरपंच तथा शाळा समितीचे सदस्य श्रीकृष्ण वाठ हे लाभले होते.तर प्रमुख अतिथी म्हणून सत्कारमूर्ती महाराष्ट्र शासनाव्दारे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक अंकुश गावंडे,अरुणा घुगे मुख्याध्यापिका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभा व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एम. तिरमारे हे लाभले होते.
याप्रसंगी स्व.मातोश्री सरस्वतीबाई वाठ,स्व. मातोश्री त्रिवेणीबाई बोंडे व स्व.मातोश्री गौराबाई गुढे या मातृशक्तींच्या प्रतिमेचे पूजन करून रजत महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आदर्श शिक्षक प्राप्त व फाउंडर ऑफ वर्ल्ड वाईड ग्रीन प्रोजेक्ट मेंबर अंकुश गावंडे यांचा सत्कार कृष्णराव वाठ व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.एम तिरमारे सर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शरद तिरमारे म्हणाले की कोणत्याही क्षेत्रातील मोठेपण हे सहजरित्या प्राप्त होत नाही त्यासाठी अपार कष्ट उपसावे लागतात, चिकाटीने सतत साधना करावी लागते, कधी सर्वस्वाचा त्याग करावा लागतो असे ते म्हणाले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सत्कारमूर्ती अंकुश गावंडे म्हणाले की, अभ्यासातून आनंद मिळत नसेल तर अभ्यासाला अर्थ नाही. मानवी जीवनातील व्यवहार जाण्याची ओढ ही ज्ञान साधनेची पहिली अट आहे असे ते म्हणाले. या दिनाच्या औचित्य साधून विद्यालयातील संपूर्ण परिसर स्वच्छ करून वर्ग सजावट चा उपक्रम राबविण्यात आला विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद तिरमारे यांचा वाढदिवस सुद्धा साजरा केला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विद्यालयातील सहाय्यक शिक्षक नितीन तायडे, डी. एन झेले, एस व्ही मोलके, पल्लवी तिरमारे, अभिजीत गुढे, मिलिंद तायडे, गोवर्धन भेदोडकर व मदन खंडारे यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेश मोलके व आभार प्रर्दशन प्रभाती ठवकर यांनी केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!